Friday, October 17, 2025

वसुबारस..सवत्सगोपूजन

 

दीपावली पुष्प  २
पहिला दिवस.. वसुबारस..सवत्सगोपूजन करा


भारतात दिवाळी हा सण खूपच प्रसिद्ध आहे. विविध राज्यांतील संस्कृतीप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते.  दिवाळी साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. गोवI हे शेतीप्रधान राज्य आहे तसेच गाई, गुरे, जनावरे यांनाही प्रत्येक घरात महत्त्वाचे स्थान आहे. गाई तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे वसुबारस, म्हणजेच *दिवाळी सुरू होण्याचा पहिला दिवस*
*वसु बारस हा दिवस, कृतज्ञता दिवस म्हणून अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशीस साजरा केला जातो.* या द्वादशीस गोवत्स द्वादशी असे देखील म्हटले जाते. वसु या शब्दाचे खूप अर्थ सांगितले जातात. वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे कुबेर, वसु म्हणजे धन आणि सर्वात महत्त्वाचा अध्यात्मिक अर्थ म्हणजे “सर्वांमध्ये वास करणारा” असा आहे आणि बारस म्हणजे द्वादशीचा दिवस.
या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे,आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख

No comments:

Post a Comment