उद्धरी गुरुराया ....श्री दत्तजयंती पुष्प ३
जेव्हा दत्तभक्त साधना / उपासना करतो व दत्तमहाराज यांचेकडून अनुभूती अपेक्षा करतो तेव्हा दत्त महाराज काय दऊ पाहतायत हे आपण ओळखावे. महाराज जे देतात ते आपल्या हिताचेच असते मात्र आपण त्याचा अर्थ समजण्यात कमी पडतो.
थोडक्यात सांगांयचे तर मेघ बरसून जीवनावश्यक पाउस पडू लागल्यावर माणसे चिखलाविषयी तक्रार करतात. आपल्याला ज्यावेळेस एखादी गोष्ट असह्य होते तेव्हा आपणास ती गोष्ट पटत नाही. असंच काहीसं साधनेतही आहे. दत्त महाराज प्रदीर्घ आनंद देवू पाहतायत, आपण मात्र क्षणभंगुर सुख कवटाळून बसलोय. तीर्थयात्रा,परिक्रमा,दत्तदर् शन,यागादी महापुण्यकर्मांचे संचित महाराज देतात आणि आपण मात्र लहान सहान गोष्टींवर डोंगरा एवढी शक्ती वाया घालवत ह्या सुखाला मुकतोय.
ह्यानेच मनस्थिती विचलित होते. मग आपल्याला नामस्मरण कठीण वाटते, वेळ कमी पडतो, योग , संकेत, आदेश, आज्ञा ह्यासारख्या महत्वपूर्ण संज्ञांचे अर्थच बदलून जातात, ईश्वर सानिध्यात असूनही मनस्ताप होतो. चिंतन सोडून जीवनी केवळ चिंताच राहते. आणि आपणास वाटते की हे आपले कठोर प्रारब्ध आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनेचा योग्य अर्थ समजून घेणे खूप महत्वाचे आहे. ज्या साधकांना साधनेत इतरत्र कुठल्याही माध्यमांचे मार्गदर्शन मिळत नाही त्यांनी तर ह्या घटना, 'संधी' म्हणुनच बघाव्यात. ह्यातूनच पुढची दिशा गवसते. आपले विचार हेच आपले गुरू आहेत असे मानून वैचारीक प्रगल्भता वाढवावी. पारमार्थिक गोष्टी, प्रापंचिक बुद्धिने पाहिल्यास ज्या मोक्षासाठी धडपडतोय तो अधिकच दूर जाऊ लागतो.
लक्ष वरुषासी l करितोसी उदासी ll असं दत्त महाराजांच्या बाबतीत म्हटलं जात ,लक्षावधी वर्षांच्या तपाने ज्याला प्रसन्न करता येत नाही असा हा त्याचा अर्थ होतो, इतकं तप केलं आणि नाही भेटले दत्त महाराज पण म्हणून ते तप व्यर्थ जात असेल का ? शक्य नाही ,फळ निश्चित आहे ,थांबायची तयारी हवी . असे अनेक जन्म लोटले आणि त्याचे संचित फळाला आले कि दत्त महाराज निश्चित कृपा करतात .दत्तमहाराज चित्रे ,पदे ,लेख ,माहिती कोणत्याही प्रकारे का होईना रोज त्यांचे स्मरण होत आहे ,मनन होत आहे ,वंदन होत आहे . ह्या जन्मीचे हे कर्तव्य आहे आणि ते आपल्याकडून करवून घेत आहेत ,पुरेसे आहे ,आपल्यावर त्यांचे लक्ष आहे हि जाणीव पुरेशी आहे .
दत्तगुरूंची कृपा --
"दत्तगुरूंची कृपा ही केवळ भक्तीचा प्रतिफळ नसून, ती त्यांच्या अनंत करुणेचे आणि दिव्य दृष्टिकोनाचे प्रतीक आहे." — ही ओळ केवळ एक वाक्य नसून, ती दत्ततत्त्वाच्या गूढ आणि अथांग स्वरूपाची साक्ष आहे.
दत्तगुरू म्हणजे त्रिगुणातीत, त्रिकालज्ञ, आणि त्रिलोकाधिपती. त्यांनी नाथ संप्रदायात, वेदांतात, आणि सामान्य भक्तांच्या जीवनात विविध रूपांनी प्रवेश केला. श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, अक्कलकोट स्वामी, — ही सर्व त्यांच्या कृपारूपी लीला आहेत.
कृपा म्हणजे तरी काय?
कृपा म्हणजे केवळ मिळालेला वर नाही, ती म्हणजे एक अंतर्बोध, एक अंत:स्फुरण… एक अशी अनुभूती की जी संकटातही शांती देते आणि यशातही नम्रता देते.
दत्तगुरूंची कृपा कधीही मोजता येत नाही — ती भक्त किती माळा घालतो, किती व्रते करतो, यावर ठरलेली नसते. अनेकदा ती त्या जीवाला मिळते जो हतबल असतो, हरवलेला असतो, पण अंतर्यामी त्या परमसत्तेला पुकारतो — हसत, रडत किंवा शांततेत.
भक्तीपेक्षा पुढे नेणारी कृपा
भक्ती ही जरी कृपेला आमंत्रण देणारी असली, तरी दत्तगुरूंची कृपा भक्तीच्या पलिकडील गोष्ट आहे. ती कृपा अशा पातळीवर कार्य करते जिथे “मी” संपतो आणि “तो” उरतो.
त्यांची कृपा, वाईट प्रवृत्ती नष्ट करते .
.. विवेक जागृत करते ..मन निर्मळ करते
....आत्म्याशी संपर्क घडवते...ती कृपा कधी आजारातून बरे करते, कधी कर्जातून मुक्त करते, पण कधी कधी ती फक्त अंतर्मनात “शांततेचा दीप” लावते — आणि तेच खरं चमत्कार असतो.
कृपा अनुभवायची असते, मागायची नसते.
दत्तगुरूंना “द्या, सांगा, हवंय” असं म्हणण्याआधीच त्यांना आपल्या हृदयाचा स्पंदन ठाऊक असतं. त्यांच्या कृपेने अनेकांना आयुष्याचा मार्ग सापडला, आत्मज्ञान मिळालं, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे — “स्वतःला ओळखण्याची दृष्टी” मिळाली.
दत्तगुरूंची कृपा ही शरणागतीची परिपूर्ण फलश्रुती आहे. जेव्हा जीव स्वतःचा अभिमान, संकोच, अपेक्षा सोडून "हे गुरूदेव, तुम्हीच सर्व काही!" म्हणतो — तेव्हा कृपा आपोआप ओसंडून वाहते.
ती कृपा निःशब्द असते, पण तिचा प्रभाव जीवनभर साथ देतो. ती कृपा म्हणजेच — मोक्षाचा झरा.
"दत्तगुरूंची कृपा, ही शब्दात नाही तर हृदयात उमगते —
ती एकदा लाभली, की आयुष्य बदलते, आणि आत्मा उजळतो."
आध्यात्मिक मार्गात अडथळे का येतात?
आजकाल अनेक जण म्हणताना दिसतात, “देवाची उपासना सुरू केली आणि उलट त्रास वाढले… म्हणून आता फारसा देव-धर्म करत नाही.” हे वाक्य अनेकदा आपण ऐकतो, पण या मागचं खरं कारण फार कमी लोकांना माहीत असतं.
माणूस साधारणपणे अडचणींमध्ये, संकटांमध्ये असताना देवाची आठवण काढतो. तेव्हा तो जप, ध्यान, व्रत, सेवा सुरू करतो. पण आश्चर्य म्हणजे, याच वेळी त्याच्या आयुष्यात काही विचित्र घटना घडायला लागतात — घरात वाद-विवाद होतात, गैरसमज वाढतात, शरीर अस्वस्थ होतं, कामांमध्ये अडथळे येतात, व्यवसायात अडचणी वाढतात. आणि मग माणूस गोंधळतो, निराश होतो, आणि उपासना थांबवतो.....इथेच आपण चुकतो!
खरंतर, उपासना सुरू होताच आपल्या आत वर्षानुवर्षे साठलेली नकारात्मक ऊर्जा अस्वस्थ व्हायला लागते. ही नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून जात नाही. कारण ती आपल्या मनावर, शरीरावर आणि कर्मांवर आपली पकड घट्ट बसवून ठेवते.आध्यात्मिक साधना, मंत्रस्मरण, जप-तप यामध्ये इतकी ताकद असते की ही नकारात्मक शक्ती हळूहळू वितळायला लागते, बाहेर पडायला लागते. पण ती सहजपणे जात नाही; ती प्रतिकार करते, त्रास देते. याच काळात आपण अधिक सावध, धैर्यशील राहिलं पाहिजे.
जेव्हा आपण हार न मानता उपासना चालू ठेवतो, तेव्हा हे अंधाराचे थर गळून पडतात. मग आयुष्यात नवीन प्रकाश येतो, इच्छा पूर्ण व्हायला लागतात, पूर्वकर्मांचा निचरा होतो, पुण्यसंचय सुरू होतो — आणि हेच पुण्य संकटाच्या काळात आपली ढाल बनतं.
त्यामुळे, संकटं आली, अडचणी वाढल्या तरी उपासना सोडू नका. कारण तीच खरी परीक्षा असते.
म्हणुन श्री दत्त महाराज म्हणतात — “एकदा माझ्या छायेखाली आलो की भीती नाही.”
आध्यात्मिक मार्ग हा काटेरी असतो, पण त्याच्यातून चाललात तर शेवटी फुलांचा सडा मिळतो.
दत्तगुरूंची कृपा ही शरणागतीची परिपूर्ण फलस्वरूप आहे. जेव्हा जीव स्वतःचा अभिमान, संकोच, अपेक्षा सोडून "हे गुरूदेव, तुम्हीच सर्व काही!" म्हणतो — तेव्हा कृपा आपोआप ओसंडून वाहते.
गुरू चरणी ठेवीता भाव । आपोआप भेटे देव ।।
म्हणूनी गुरूंसी भजावे । रुप ध्यानासी आणावे ।।
देव गुरूपाशी आहे । वारंवार सांगू काहे ।।
तुका म्हणे गुरू भजनी । देव भेटे जनी वनी ।।
"श्री दत्त अनघा" दाम्पत्य व अनघा लक्ष्मी व्रत
श्री दत्तगुरूंची योगपत्नी 'अनघा'"दत्तगुरू हे राम, कृष्ण यांच्याप्रमाणे गृहस्थाश्रमात फार कमी राहिले.
अनेकांना माहीत नाही आहे की, दत्तगुरुंचा विवाह झाला होता व त्यांना आठ पुत्र होते.
हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल पण, हो! दत्तगुरुंची पत्नी होती.
योगपत्नी 'अनघा' हे तिचे नाव".
दत्तगुरू हे वैराग्यसूचक, संन्यासी होते. हे आपण यापूर्वीच पाहिले.
दत्तांना 'अनघ' असे नाव आहे.
दत्तगुरू हे गृहस्थाश्रमी नव्हते, परंतु त्यांना पत्नी व मुले होती.
ही पत्नी योगपत्नी होती व तिचे नाव अनघा असे होते; आणि योगपत्नी पासून दत्तगुरुंना आठ पुत्र होते.
हे आठ पुत्र म्हणजे अष्टयोगसिद्धी होय.
माता अनघा ब्रह्मगुणांनी युक्त अशा लक्ष्मीस्वरूप होत्या.
त्या दत्तगुरुंसमवेत असत.
त्यांना आणिमा, लछीमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, ईशीत्व, वशीत्व, कामावसायीता या आठ योगसिद्धी पुत्ररूपाने झाल्या होत्या.
अनघा देवी कोण?
दत्तगुरुंची योगपत्नी अनघा देवी म्हणजे कोण?
आपली योगपत्नी अनघा विषयी 'अनघ' दत्त सांगतात की, ही देवी म्हणजे लक्ष्मीदेवीचे प्रतिरूप आहे.
अनघा देवीचे स्वरूप हे दिव्य मातृत्व स्वरूप आहे.
३ देवतांचा आधार असणारी ही त्रिशक्ती स्वरूपीणी म्हणजे माता 'अनघा' आहे.
ती महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली आहे.
दत्तगुरू म्हणतात 'अनघा' हे वामभागात धारण केलेले माझे शक्तिस्वरूप आहे.
अनघा ही दशविद्या स्वरूपीणी आहे.
तिची आराधना केल्यास अष्टसिद्धी प्राप्त होऊन दशमहाविद्येचे फळ प्राप्त होईल.
दत्तगुरू सांगतात की, लक्ष्मीदेवीचे प्रतिरूप असणाऱ्या अनघा देवीत राजराजेश्वरी, महालक्ष्मी, महाकालीची सर्व लक्षणे असून ती विष्णूरूप असून माझ्यात म्हणजे अनघात एकरूप आहे.
'अनघ' म्हणजे काय?
अष्टमी तिथीचे महत्त्व 'अंघं' शब्दाचा अर्थ पापे नाहीसे करणे होय.
तर 'अनघ'म्हणजे भक्तीने ज्याला वश केले असता सर्व पापे नष्ट होतात.
त्यामुळे जग 'निष्पाप' होते.
तो म्हणजे 'अनघ' होय.
निष्पापत्व म्हणजे दत्ताचा अंश होय.
तर पाप नाहीसे करणारी तिथी म्हणजे अष्टमी तिथी होय.
सहस्त्रार्जुनाने प्रसिद्ध केले अनघा-अष्टमीव्रत - सहस्त्रार्जुन हा परम दत्तभक्त व शिष्य होता. त्याने सर्वप्रथम दत्तगुरुंची योगपत्नी अनघा हिचे व्रत केले.
हे व्रत अष्टमीला केले म्हणून त्याला अनघा अष्टमी व्रत असे म्हणतात.
या राजानेच हे व्रत पृथ्वीवर प्रसिद्ध केले.
श्रीकृष्णाने अनघा अष्टमीचे व्रत व त्याचे माहात्म्य युधिष्ठिरास सर्व प्रथम सांगितले.
सहस्त्रार्जुन या व्रताने अजिंक्य झाला होता.
दत्तमहाराज दिव्य स्तोत्र 
(
पितृदोषावर प्रभावी उपाय.
)
पितृदोषावर प्रभावी उपाय.
)हे *दत्तात्रेय दिव्य स्तोत्र* अतिशय दिव्य असून, श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे.तसेच हे *पितृदोषावर प्रभावी* स्तोत्र आहे.याने तात्काळ पितृदोष निवारण होण्यास मदत होते.
हे *श्री दत्तात्रेय दिव्य स्तोत्र* म्हणण्यापूर्वी खालील दिव्य पितृ तर्पण विधी अवश्य करावा.
हा विधी घरातील कर्त्या पुरुषाने करावा. *ज्यांचे वडील हयात आहेत त्यांनी हा पितृ तर्पण विधी करु नये.*
*दिव्य तर्पण विधी :-*
*साहित्य -:
तांब्याचे ताम्हण,पंचपात्र,त्यात पाणी घ्यावे,आणि पळी
1) हा विधी सकाळी आंघोळ झाल्यावर लगेच करावा.
2) विधी करण्यासाठी दक्षिण दिशेला तोंड करून बसावे.
3) *प्रार्थना :-*
हे ज्ञात,अज्ञात समस्त पितृ देवता मी तुम्हाला नमस्कार करते / करतो.
माझ्याकडून माझ्या पती / पत्नी कडून , माझ्या आई,वडीलांकडून ( जिवंत असतील त्यांची नावे घ्यावी ),
स्त्री असेल तर माझ्या आई, वडील,सासू,सासरे आणि घरातील सर्वांकडून काही चुकले असेल, तुमचे काही करायचे राहिले असेल तर आम्हांला क्षमा करा आणि जे काही करायचे राहिले असेल ते आमच्या कडून करवून घ्या.त्यासाठी आम्हाला कळेल असे संकेत देऊन,बुद्धी,शक्ती,संधी आणि मार्ग द्या.तुमच्या सगळ्या इच्छा अतिशय शांतपणे आमच्या कडून पूर्ण करून घ्या.तुम्हाला शांती, मुक्ती,सदगती,मोक्ष प्राप्ती होउ दे.आणि त्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी आमच्या कडून करवून घ्या.
तुमचे शुभाशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत. तुमच्या आशीर्वादाने आमच्या मार्गातले,कार्यातले सगळे अडथळे दूर होऊ देत.
(यात मी माझ्या पद्धतीत प्रार्थना सांगितली आहे. तुम्हाला हवे असलेले आणखी तुम्ही यात वाढवू शकता.)
4) अशा प्रकारे,प्रार्थना केल्यानंतर उजव्या हाताच्या तळव्यात पळीने पाणी घ्यावे.
पुढील मंत्र म्हणून पाणी अंगठ्याच्या बाजूने ताम्हणात सोडावे.
पुन्हा हातात पाणी घेऊन मंत्र म्हणून पाणी अंगठ्याच्या बाजूने ताम्हणात सोडावे.
*हि क्रिया १२ ते १५ वेळा करावी.*
मंत्र :- *ॐ सर्वेभ्यो पितृभ्यो स्वधा नमः स्वधा तर्पयामी।*
5) आता हात जोडावे.आणि म्हणावे...
*ॐ शांती! शांती! शांती!*
*इति दिव्य पितृ तर्पण विधी समाप्तः ।*
*पितृ देवतार्पणमस्तु ।।*
6) आता ते पाणी बेसिन मध्ये टाकावे.झाडाला टाकू नये.
*हा विधी करताना एखाद्या ठराविक व्यक्तीचे नाव सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्यांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगण्यास विनंती करू शकता.*
7) विधी करून झाल्यानंतर तोंड,हात,पाय धुवून नंतर देवाला नमस्कार किंवा पूजा करावी.
8) आपली नित्य देवपुजा झाली कि मग हे *श्री दिव्य दत्तात्रेय स्तोत्र* पुर्ण श्रद्धेने म्हणावे.
9) स्तोत्र पठण करण्यापूर्वी आणि स्तोत्र पठणानंतर *श्री दत्तात्रेयांना* आपल्या *सर्व ज्ञात आणि अज्ञात पितरांना शांती,मुक्ती,सदगती,मोक्ष मिळवून देण्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी.*
ज्यांना *प्रखर पितृदोष* आहे.त्यांनी *रोज सकाळ,संध्याकाळ* हे *दिव्य श्री दत्त स्तोत्र* म्हणावे.
या उपायाने अल्पावधीतच आपला *पितृदोष समाप्त होईल.* यात तिळमात्र शंका नाही.
*हे दिव्य स्तोत्र श्रीनारद पुराणातील असुन हे स्वतः श्रीनारदमुनींनीच रचले आहे.*
नारदमुनींच्या नामस्मरणाबाबत आपण सर्वच जाणून आहोत.सतत भगवान नारायणाच्या नामाचा नामघोष करीत नारद मुनीं वैकुंठामध्ये कायम गमन करीत असतात आणि त्यांनी भगवंताच्या हृदयात कायम स्थान मिळविले.
भगवान दत्तात्रेय हेच भगवान विष्णु असून यांच्या नानारूपधर ख्यातीची नारदमुनींना कल्पना होती अर्थात आहे. या स्तोत्राची रचना करताना नारदमुनींनी सामान्यजनांस सहज आकलन व्हावे आणि सर्वांकडून स्तुतीरूप स्मरण भक्ती व्हावी हि इच्छा समोर ठेवली होती.
अष्टादश अर्थात अठरा श्लोकात या स्तोत्राची रचना आहे.अठरावा श्लोक हा फलश्रुतीचा आहे.
हे स्तोत्र *शत्रूंचा नाश करणारे*,तसेच *शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रह्मानुभव देणारे* असून याच्या पठणाने *सर्व पापांचे शमन* होते.
आता शत्रू म्हणजे इथे तुम्हाला न आवडणाऱ्या माणसांची अथवा प्राण्यांची यादी नव्हे तर कामादि षड्रिपूना इथे शत्रू म्हटले आहे.त्यांचा नाश झाल्यावरच *ब्रह्मानुभव* प्राप्त होऊ शकतो
।। श्री दत्तात्रेय दिव्य स्तोत्र ।।
जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् ।
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ।।
अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारदऋषिः।
अनुष्टुप् छन्दः । श्रीदत्तपरमात्मा देवता ।
श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥
जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे ।
भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १॥
जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च ।
दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ २॥
कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च ।
वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ३॥
र्हस्वदीर्घकृशस्थूल-नामगोत्र- विवर्जित ।
पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ४॥
यज्ञभोक्ते च यज्ञाय यज्ञरूपधराय च ।
यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ५॥
आदौ ब्रह्मा मध्य विष्णुरन्ते देवः सदाशिवः ।
मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ६॥
भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे ।
जितेन्द्रियजितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ७॥
दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपध्राय च ।
सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ८॥
जम्बुद्वीपमहाक्षेत्रमातापुरनि वासिने ।
जयमानसतां देव दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ९॥
भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे ।
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १०॥
ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले ।
प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ११॥
अवधूतसदानन्दपरब्रह्मस्वरूपिणे ।
विदेहदेहरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १२॥
सत्यंरूपसदाचारसत्यधर्मपरायण ।
सत्याश्रयपरोक्षाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १३॥
शूलहस्तगदापाणे वनमालासुकन्धर ।
यज्ञसूत्रधरब्रह्मन् दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १४॥
क्षराक्षरस्वरूपाय परात्परतराय च ।
दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १५॥
दत्त विद्याढ्यलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे ।
गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १६॥
शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकम् ।
सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १७॥
इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम् ।
दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम् ॥ १८॥
॥ इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं दत्तात्रेयस्तोत्रं सुसम्पूर्णम् ॥
आपण रोज हे दिव्य दत्तात्रेय स्तोत्र पठण करून *श्री दत्तात्रेय भगवानांची कृपा* प्राप्त करून घ्यावी आणि त्याच सोबत *पितृदोषातुन मुक्त* व्हावे.
दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी !
औदुंबरी नित्य वसे, भक्तकाम पुरवितसे !
कमलनयन श्याम दिसे, धन्य तो जनी !
अनसूया ज्याची माय, दृढ धरिले ज्याचे पाय !
श्री दत्तगुरु श्री दत्तात्रेय: जिथे प्रेम आणि करुणेची भावना असते तिथे भगवान दत्तात्रेयांचा निवास असतो
।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

No comments:
Post a Comment