Saturday, October 18, 2025

धनत्रयोदशी चे महत्त्व व पूजाविधी

 दीपावली  विशेष पुष्प    

धनत्रयोदशी चे महत्त्व पूजाविधी

या दिवसाला बोलीभाषेतधनतेरसअसे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.

धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै-पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम / भाग प्रभुकार्यासाठी व्यय करावा, असे शास्त्र सांगते.’

 या दिवशी श्री विष्णूच्या अप्रकट शक्तीच्या आधारे श्री लक्ष्मीची उजवी नाडी कार्यरत होऊन त्यातून उत्पन्न होणार्‍या तेजतत्वात्मक लहरी वेगाने ब्रह्मांडाकडे झेप घेतात. लक्ष्मीतत्वाच्या उजव्या नाडीच्या कार्यरत अवस्थेमुळे या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातील वायूमंडल हे सोन्यासारख्या चमचमणार्‍या सोनेरी कणांनी उजळून निघालेले असते. या चमचमणार्‍या सोनेरी कणांतील श्री लक्ष्मीचे चैतन्य जिवाला मायेतील ऐश्वर्य प्रदान करून त्याच्या साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करते; म्हणून या दिवशी धनाच्या रूपात श्री लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. श्री लक्ष्मीच्या भावपूर्ण पूजेमुळे प्रत्यक्ष धनाच्या अधिपतीचे, म्हणजेच कुबेराचे पृथ्वीच्या कक्षेत आगमन होते.

म्हणून या दिवशी संध्याकाळी श्रीलक्ष्मी कुबेर यांचे पूजन केले जाते.

*पूजा विधी-*:

 संध्याकाळी एका चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र पसरावे.
त्यावर तांदळाने  दोन स्वस्तिक काढावेत.
एका स्वस्तिक वर श्रीयंत्र दुसऱ्या स्वस्तिक वर कुबेर यंत्र ठेवावे.
यंत्र नसेल तर फ़ोटो ठेवावा.
त्या समोर एका ताटात  फुलांच्या  पाकळ्या वर घरातील चांदीची नाणी,सोन्याचे दागदागिने, नोटा,सुटी नाणी ठेवावीत.
दोन्ही यंत्रे/फोटो ताटातील वस्तूंची यथासांग पूजा करावी
.

धूप दीप दाखवावा.
श्री लक्ष्मी श्री कुबेर यांचे मंत्र म्हणावेत.
देवीची आरती करावी.
गोडाचा नेवेद्य दाखवावा.
मनोभावे प्रार्थना करावी
.

 *धन्वंतरी पूजनविधी*

 धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर धन्वंतरी पूजनाचा संकल्प करावा. धन्वंतरीची मूर्ती किंवा तसबीर स्थापन करावी. धन्वंतरी पूजनाच्या आधी गणपती पूजन करावे. यानंतर धन्वंतरीचे आवाहन करावे. धन्वंतरीची षोडशोपचार पूजा करावी. पूजा झाल्यानंतर * श्री धनवंतरै नम:* या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. तसेच * नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धनवंतराये:अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय। त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूपश्री धन्वंतरि स्वरूप श्री श्री श्री अष्टचक्र नारायणाय नमः* असे म्हणून धन्वंतरीला मनापासून नमस्कार करावा. शक्य असल्यास धन्वंतरी स्तोत्राचे पठण करावे.

*धनत्रयोदशीचे महत्त्व*

 पौराणिक मान्यतांनुसार, देव आणि दानवांनी मिळून केलेल्या समुद्र मंथनातून अश्विन कृष्ण त्रयोदशीला धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. पुराणातील काही उल्लेखांनुसार, धन्वंतरी हे श्रीविष्णूंचे अंशावतार मानले गेले आहे. अश्विन कृष्ण त्रयोदशी हा धन्वंतरी जन्म मानला गेल्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते. या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. तिन्हीसांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता आहे. या दिवशी यमदीपदान केले जातेधनत्रयोदशीला दिवे लागणीच्या वेळी घराबाहेर एक दिवा लावून त्याचे टोक दक्षिण दिशेला करून त्यास नमस्कार करावा. यामुळे अपमृत्यु टळतो, असा समज आहे.

 आपण आपले कुटुंब यास आयु आरोग्य सुख समृद्धी प्राप्त हो ही दत्तमहाराज यांचे चरणी प्रार्थना

No comments:

Post a Comment