श्री स्वामी समर्थ ....सिद्ध मंत्र- सुरुवात कशी व केव्हा झाली ?
*श्री बाळाप्पाना स्फुरलेला सिद्ध मंत्र श्री स्वामी समर्थ*
श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र श्री बाळप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला, कारण त्यांचे पोट दुखायचे. नाभीस्थानांत एक छोटीशी विषाची पुडी अडकली आहे.
ती सव्वा लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल. आता हा सव्वा लाख जप कोणता करायचा? असा प्रश्न श्री बाळप्पा आणि सौ. बाळप्पा यांना पडला. कोणी ग्रामदेवतेचा, तर कोणी कुलदेवतेचा सव्वा लाख जप केला, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
शेवटी बाळप्पा श्री स्वामी समर्थां समोर भल्या पहाटे बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण मनातल्या मनात पुटपुटू लागले. श्री स्वामींनी मान हलवून होकार दिला. एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि सव्वा लाख जप कर, तू आपोआप बरा होशील. त्याप्रमाणे अक्कलकोट येथील हाफक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री. बाळप्पा गेले, तेथे सतत एक कलमी सव्वा लाख जप केला आणि नाभिस्थानातून विषाची बारीक पुडी बाहेर आली. म्हणून श्री स्वामी समर्थ, हा शास्त्र शुद्ध-स्वयंभू आणि स्वत: श्री स्वामी समर्थाची अनुमती असलेला जप मंत्र आहे.
No comments:
Post a Comment