Monday, September 15, 2025

जीवनाविषयी ही सत्ये नीट जाणून घ्या ...

 जीवनाविषयी ही सत्ये नीट जाणून घ्या ....

 💐जीवन हा समुद्र आहे. विचार आणि बुद्धी यांच्या मंथनातून माणसाने कृती करत गेले तर ते रत्नासारखे दैदिप्यमान होते. सागरात पर्वत बुडणारच पण तोच श्रीहरीने धारण केलेल्या कच्छपावताराच्या पाठीवर ठेवला तर स्थिरही राहतो आणि गरागरा फिरतोही. परमेश्वराचे अधिष्ठान राखून माणसाने जीवन सागर घुसळला तरच रत्नकृती निर्माण होतील. त्यासाठी कोणतेही कर्म भगवंतांला स्मरून करा आणि भगवंताला अर्पणही करा.
💐 *प्रपंचाचा फोलपणा, मनुष्य जन्मात भोवती असलेले माया-जाल, दुर्बुद्धीने माणूस-जन्मात परमेश्वर भक्ती न करता किंवा स्व-स्वरूपाला न ओळखता अहंकाराने वागतो. दान, तप, जप, करतो तेही पुन्हा पुढच्या जन्मात असेच ऐश्वर्य मिळावे या हेतूनेच करतो. जप-तपातही भागवत्पारायणता ठेवीत नाही. तेंव्हा जीवनात  येऊन भगवत भक्ती न करता विषय भोगांचीच अभिलाषा करतो. त्यामुळे ते ८४ च्या फेऱ्यातून सुटत नाहीत म्हणून भगवत्भक्ती आशा-आकांक्षेच्या पूर्ततेसाठी करू नये.*
💐 *जीवन क्षणभंगुर आहे. आजचे काम उद्यावर टाकणे बरे नव्हे असा व्यवहारीक विचार करणे, जीवनाची क्षणभंगुरता जाणणे हे पारलौकिकाच्या साधनेसाठी लक्षात घ्यावेच लागते. पण गुरूला दिलेला शब्द मोडणे हे इह व पर दोन्ही लौकिकाला बाध करणारे आहे. स्वतःला सर्वज्ञ समजणे गुरुची कोणतीही कृती अज्ञानाची असते, चुकीची असते असे वाटणेच स्वतःला सर्वज्ञ समजणे आहे. गुरूंची अवज्ञा करणाऱ्याला, गुरूंचे वर्म काढणाऱ्याला ज्ञान मिळत नसते. त्याची अधोगतीच होत असते. याचा अर्थ एवढाच आहे की गुरुंबद्दल अनादराची भावनाही अधःपतनाला कारणीभूत होत असते.*
💐 *परमेश्वराच्या न्यायालयात न्याय फार वेगळा असतो... शांत राहून चांगल कर्म कराव... ईथ प्रत्येकाचा खटला चालू आहे. फक्त वेळेची वाट बघा.. निकाल सगळ्यांचा आहे.*_
_*पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत मालक नाही हे ज्याला कळाले त्याला खरे जिवन कळाले आनंदी रहा सुखी रहा.*_
_*दुसर्‍याच्या पराभवाची वाट बघणार्‍याला हे समजतच नाही की तो दुसर्‍याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वत:चा वेग आपोआपच कमी होत असतो.*_
✨🌺 ✨🌺✨
_*पायाचं दुखणं आणि संकुचित विचार, माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत...! तूटलेली लेखणी आणि इतरांशी इर्शा, स्वतःच भाग्य लिहू देत नाही...!! कामाचा आळस आणि पैशाचा लोभ, माणसाला मोठ होऊ देत नाही...!! आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे, हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही..!!*_
✨🌺✨ 

_*आनंद हा विकत मिळत नाही, आनंद हा स्वभावात असायला हवा.*_
_*दुसऱ्यांना केलेल्या मदतीमुळे मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो.
_*नेहमी इतके आनंदी रहा की, तुम्हाला पाहिल्यावर इतरांनाही ईर्षा होईल, हा इतका आनंदी कसा.*_
✨🌺✨ 
   _*स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो, कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!*_
✨🌺✨  
_*नातं कुठलंही असो तिथं प्रेम हे मनापासून असावं शब्दांपुरत नाही आणि राग हा शब्दांपुरताच असावा मनातून नाही...
_*आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुध्दा कुठे तरी काही चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं.*_
_*फार कमावून गमवण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्त्वाचे आहे मग तो पैसा असो की माणसे..!*_

 : 💦💦💦💦💦💦💦💦💦💦
                

💧मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही.*

💧माणूस हा झाडासारखा आहे. तो सुखासुखी वठत नाही, तो ओलावा शोधत राहतो. त्याचं खर प्रेम असतं जीवनावर मग ते जीवन कितीही विद्रूप, कितीही भयंकर असो, कारण मृत्युनंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही हे तो मनोमन जाणतो.*

💧ज्या माणसाच्या जवळ सत्य, पावित्र्य आणि निःस्वार्थवृत्ती या तीन गोष्टी असतील, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. हया तीन गोष्टी असल्यावर आख्खे विश्व जरी विरोधात उभे राहिले तरी, त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकतो.*


💦💦💦💦💦💦💦💦💦💦
*काही माणसं लाखात एक असतात, आणि काहींकडे लाख असले, तरी ते माणसात अजिबात नसतात. दु:खाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.*
✨🌺✨ 
"दुःख" आणि "त्रास" ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत. जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते...!
.जो माणूस कष्टाला लाजत नाही. त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही..!
✨🌺✨ 
*कोणी कितीही चिडवण्याचा अथवा अपमानीत करण्याचा प्रयत्न केला, तरी मनावर संयम ठेवून, शांत राहून, त्यांची जागा त्यांना दाखवणे, हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.*                
*घर रस्त्यावर असेल तर त्याची किंमत येते. शेती रस्त्यावर असेल, तर त्यालाही भाव  असतो... पण माणूस रस्त्यावर आला, की त्याची किंमत  संपते.*
✨🌺✨ 
*एखादी वस्तू न वापरता गंजते, आणि जास्तच वापरली तर झिजते. काहीही झालं, तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केंव्हांही उत्तमच.*
✨🌺✨ 

*मनुष्याने गृहस्थधर्म म्हणून जे जे करणे आवश्यक आहे त्याला पैशांचा व्यर्थ व्यय समजू नये. धन मिळवणे, ते वाढवणे, त्याचे रक्षण करणे, या चिंतेनेच तो कष्टी होत असतो. समस्यांच्या निवारणार्थ आणि उपभोगार्थच हे धन साधन आहे हेच त्याला कळत नाही. आपले जीवन पैसा कमावण्यासाठी नसून पैसे सुखी जीवनाचे साधन असते. चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, वैर, भेदबुद्धी, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार आणि मद्य हे पंधरा अनर्थ या अर्थामुळे होतात. "अर्थ" नावाच्या अनर्थाला दूर ठेवले पाहिजे.
 । । शुभम भवतु ।।

No comments:

Post a Comment