सूर्याला अर्घ्य का व कसे देतात ? त्याचे फायदे काय ?
सूर्याला अर्घ्य देण्यात सूर्याचा नाही तर आपलाच फायदा आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची प्रसन्न सुरुवात होते आणि प्रसन्नता दिवसभर टिकून राहते!
सूर्याला दररोज अर्घ्य का व कसे देतात? अर्घ्य देताना कोणता मंत्र म्हणतात? जाणून घ्या!
यशस्वी होण्याचे पहिले सूत्र आहे, ते म्हणजे पहाटे लवकर उठणे. ब्रह्म मुहूर्ताला जाग येणे उत्तम, परंतु इतक्या पहाटे उठणे शक्य नसेल तर निदान सूर्योदयापूर्वी उठावे असा शास्त्राचा नियम आहे. आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगत असत, 'लवकर निजे लवकर उठे, त्यासी आयुरारोग्य लाभे!' ही सवय अंगी बाणावी यासाठी सूर्य नमस्कार आणि सूर्याला अर्घ्य देणे या दोन गोष्टींचा शास्त्रात समावेश करण्यात आला.
सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचे स्वागत करावे आणि त्याला अर्घ्य द्यावे, असा संस्कार हिंदू धर्म शास्त्रात दिला आहे. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्वागत करण्याऐवजी झोपून राहणे हा त्याचा अपमान आहे. याउलट लवकर उठून सूर्य दर्शन घेणे आणि अर्घ्य देऊन त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा संस्कार आहे. हा संस्कार बालपणापासून आपल्या मनावर रुजावा, म्हणून मुंज मुलाला वयाच्या आठव्या वर्षी उपनयन संस्कारात अर्घ्य देण्याचे महत्त्व शिकवले जाते. त्याने तो शिरस्ता आयुष्यभर पाळणे बंधनकारक असते.
. सूर्य दर्शन घेतल्यामुळे सूर्य प्रकाशात शरीर न्हाऊन निघते. त्यामुळे कोवळ्या सूर्य किरणांचा शरीराला पुरेपूर फायदा होतो. सूर्याप्रमाणे आपल्यालाही तेज लाभावे, ही भावना जागृत होते. त्याच्याप्रमाणे अथक परिश्रम घेण्याची मनाची तयारी होते आणि सूर्य ज्याप्रमाणे प्रकाश देताना कोणामध्येही दुजाभाव करत नाही, त्याप्रमाणे आपणही आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आपले कार्य पार पडावे, ही मोठी शिकवण मिळते. म्हणून रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे.
अर्घ्य कसे देतात -
तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात लाल फुलं, अक्षता आणि कुंकू घालावे. ते पाणी हात उंचावून सूर्याला अर्पण करावे. राहत्या वस्तीत, इमारतीत सूर्याला अशाप्रकारे अर्घ्य देणे शक्य नसल्यास ताम्हन घेऊन पळीत पाणी घेऊन सूर्याकडे बघत ते पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर सोडून अर्घ्य द्यावे. नंतर ताम्हणातले पाणी तुळशीला किंवा अन्य झाडांना घालावे.
अर्घ्य देताना म्हणावयाचा मंत्र - 1 )एहि सूर्य! सहस्त्रांशो! तेजो राशे! जगत्पते!अनुकम्प्यं मां भक्त्या गृहाणार्घ्य दिवाकर!
अर्थ असा आहे हे सूर्य देवता, तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे.
२ )ॐ भूर्भुवः स्व: तत्सवितुर्वरेण्यम*
*भर्गो देवस्य धीमहि धियोयोन: प्रचोदयात।*
*आदित्यस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने।*
*जन्मान्मत्तरसहस्त्रेषु दारिद्रयम नोपजायते।।*
*नमः सूर्याय शान्ताय सर्वरोग निवारिणे।*
*आयुररोग्य मैश्वर्य देहि देव: जगत्प्तये।।*
*ॐ घृणि सूर्याय नमः।*
त्याचबरोबर सूर्याची बारा नवे घेत सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्य उत्तम राहते आणि शरीर सुदृढ बनते. म्हणून रोज सकाळी सूर्याची उपासना करा. तुम्हाला पाहून घरातली लहान मुलेसुद्धा तुमचे निश्चितच अनुकरण करतील. व सूर्यनारायणास 'अर्घ्य' अर्पण करतील सूर्याची बारा नावे पुढील प्रमाणे
श्री सूर्य अर्घ्य मंत्र।*
*ॐ मित्राय नमः।*
*ॐ रवये नमः।*
*ॐ सूर्याय नमः।*
*ॐ भानवे नमः।*
*ॐ खगाय नमः।*
*ॐ पूष्णे नमः।*
*ॐ हिरण्यगर्भाय नमः।*
*ॐ मरीचये नमः।*
*ॐ आदित्याय नमः।*
*ॐ सवित्रे नमः।*
*ॐ अर्काय नमः।*
*ॐ भास्कराय नमः।*
*ॐ सवितृ-सूर्यनारायणाय नमः।*
शास्त्रात संध्या करताना सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व विशद केले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते. त्यालाच 'अर्घ्य' म्हटले जाते. वेदांमध्ये सूर्यास डोळ्याची उपमा दिली गेली आहे.
सूर्यात सप्तरंगी किरणे असतात. या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत येतात. केवळ काळा रंगच असा रंग आहे की ज्यातून सूर्य किरणे परत येत नाहीत.
आपल्या शरीरात विविध रंगांची विद्युत किरणे असतात. यामुळे ज्या रंगाची कमतरता आपल्या शरीरात असते त्या रंगाची किरणे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपणास मिळतात. डोळ्यांचे बुबळे काळी असतात. तेथून सूर्यकिरण परत जात नाही. यामुळे आवश्यक असणार्या रंगांच्या किरणांची कमतरता दूर होते.
सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात.
वैज्ञानिकांनी हे सिध्द केले आहे की सूर्य किरणांचा प्रभाव पाण्यावर लवकर पडतो. यामुळे सूर्यास पाण्याचे अर्घ्य दिले जाते. सूर्य म्हणजे आकाशात बसलेला डॉक्टर आहे. सूर्याच्या सप्तरंगी किरणांमध्ये अदभूत रोगनाशक शक्ती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सूर्य किरणांमध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत. सूर्यकिरण अनेक रोग उत्पादक विषाणूंचा नाश करतो. टिबीचे विषाणू उकळणार्या पाण्यात मरत नाहीत. पण सूर्यकिरणांनी त्वरीत नष्ट होतात. यावरूनच सूर्य किरणांमुळे कोणतेही विषाणू नष्ट होण्याबाबत शंकाच असू नये.
मानवाला निरोगी राहण्यासाठी जितकी शुध्द हवा आवश्यक आहे, तितकाच सूर्यप्रकाशही आवश्यक आहे. या प्रकाशाने मानवाच्या शरीरातील कमजोर असलेले अंग पुन्हा सशक्त आणि सक्रीय होते.
सूर्य किरणात प्रसन्नता-अप्रसन्नतेचे अणूही असतात. त्रिकाल संध्येचा संबंध सूर्याशी आहे. मुख्य संध्या म्हणजे सावित्री जप आहे. सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या ऋचांचे नाव आहे. यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते त्यावेळी अर्घ्य सूर्यास दिले जाते.
सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च (यजुर्वेद 7/42)। या मंत्राला सूर्याच्या स्थावर-जंगम पदार्थांचा आत्मा समजले जाते. जीवेत शरदः शतम् (यजुर्वेद 36/24) पासून शंभर वर्ष जगण्याची, शंभर वर्ष बोलण्याची आणि ऐकण्याची प्रार्थना सुध्दा सूर्यालाच केली जाते.
एका अमेरिकी शास्त्रज्ञाने म्हटले आहे, की जर सूर्यापासून मिळणारा उब आमच्यात सुरक्षित रहात असेल तर आम्ही चारशे वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. ही उब आपणास सूर्याकडून प्राप्त होते. सूर्य नसताना सर्व जीवसृष्टी नष्ट होते. सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. या घटकाविना पानात नैसर्गिक हिरवेपणा राहू शकत नाही. आपण दैनंदिन आहारात नेहमी हिरव्या भाज्यांचा समावेश करतो. या भाज्यांमध्येच मानवाच्या शरीरास आवश्यक पोषक घटक असतात. यामुळेच सूर्यप्रकाश मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रुपाने आवश्यक आहे.
प्रत्येक साधकाने रोज प्रातःकाळी सूर्या ला अर्घ्य समर्पित आयु आरोग्य व सुख समृद्धीची प्रार्थना करावी
ओम ह्राम ह्रिम ह्रोम स सुर्याय नमः
।।शुभम भवतु ।।

No comments:
Post a Comment