करवीर क्षेत्रीची महालक्ष्मी...आई अंबाबाई
नाव: श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई
निर्माता: चालुक्य राजा कर्णदेव
जीर्णोद्धारक: चालुक्य राजा कर्णदेव
निर्माण काल : ६३४
वास्तुकला: हेमाडपंथी
स्थान: करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र
प्रधान देवता: सर्वस्याद्या मुळ आदिमाया आदिशक्ती भगवती
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे.
मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते, आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.
*कधी काळी यवनांनी या देवळाचा विध्वंस केला, तेव्हा देवीची मूर्ती पुजार्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा. या मंदिरात वर्षातून काही ठराविक दिवशी सूर्याची किरणे मातेच्या चरणी पडतात वं शरीरावरही पडतात तेव्हा किरणोत्सव होतो .
अंबाबाईची मुखमुद्रा दरवेळी नवे गुज सांगून जाते. भृगु ऋषींनी आपल्या भ्रताराच्या वक्षस्थळी लथ्थाप्रहार केला हे पाहून अपमानित झालेली महालक्ष्मी, वैकुंठ सोडून करवीरास आली. पतीपत्नीत होणाऱ्या पेल्यातील भांडणां प्रमाणे हेही असेच एक भांडण. चार आठ दिवसांचा काय तो रुसवा. काही क्षणांसाठीच काय ते एकमेकांना मुद्दामहून विसरणे, बोटावर मोजण्या इतकीच काय ती जेवणं असतील, ज्यात एकमेकांचा चेहरा डोळ्यासमोर न आणता उचलला घास पटकन तोंडात टाकला असेल. पण हे किती दिवस?
अंबाबाई येथे येऊन येथलीच झाली. भक्तांनी तिला आईचं स्थान दिलं. लेकीबाळींचा संसार सांभाळण्यासाठी तिने जिवाचं रान केलं. वाळवंटात एखाद्याने जलाच्या शोधात धावावे तशी ती लेकरांच्या सुखाच्या शोधात धावली. श्रीविष्णुंवरचा राग तर केव्हाच गेला असेल हो, पण आई मात्र आपल्यामुळे येथेच गुंतून राहीली. अर्भकाला जसं एकटं घरात सोडून जाण्यासाठी मातेचे मन धजावत नाही त्याचवेळी प्रकोपकायी उन्हात शेतावर राबणाऱ्या नवऱ्याला जेवण घेऊन जाण्यासाठी जशी तिच्यातली पत्नी तळमळते, तशीच काहीशी अवस्था अंबाबाईची झालीये.
त्यामुळे जेव्हा केव्हा तिच्या भेटीला जाल तेव्हा स्वतःसाठी काही मागताना, तीला हेही सांगा, आई गं! तू सुखात रहा, तुझा संसार सुखाचा होवू दे! तू आनंदी तर आम्ही आनंदी. बघा आईच्या आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्यावाचून रहाणार नाहीत.
महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे, तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.
आंबा माता त्रंबोली मातेच्या भेटीस जाते ....आज अश्विन शुद्ध पंचमी आजचा दिवस कोल्हापूरकरांसाठी त्र्यंबुली पंचमी म्हणून ओळखला जातो. महालक्ष्मी (अंबाबाई)ने याच दिवशी कोल्हासूराचा वध केला. त्यावेळी तिने वर दिला की दरवर्षी मी तुझ्या नावाने कोहळा बळी देईन आणि या नगराला तुझे नाव असेल. पुढे कामाक्ष नावाच्या कोल्हासुराच्या नातवाने कपिल मुनींकडून योगदंड मिळवला. त्याच्या प्रभावाने त्याने महालक्ष्मी सह सर्व देवांचे रूपांतर बक-यांमध्ये केले. हे कळताच त्र्यंबुलीने कामाक्षाचा वध केला आणि सर्व देवांची सुटका केली. पण ते त्र्यंबुलीचे आभार मानायचे विसरून गेले त्यामुळे त्र्यंबुली रागाने शहरा बाहेर टेकडीवर जाऊन बसली तिची समजूत घालायला स्वतः महालक्ष्मी तिथे गेली व आजही तो भेटीचा सोहळा होतो. या भेटी करताच अंबाबाई आज गजारूढ रूपात सजली आहे.
कोल्हापूरला आद्य मातृशक्तीचे मुख्य स्थान म्हणतात. या क्षेत्राला 'महामातृका पीठ' व 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. श्री महालक्ष्मीच्या मंदिरातील रचना चक्रराज (श्री यंत्र) प्रमाणे सर्वतो भद्र मंडल प्रमाणे आहे. या मंदिरात पाच शिखरे व तीन मंडपे आहेत. गर्भ गृह मंडप, मध्य मंडप व गरुड मंडप हे तीन मंडप होत. प्रमुख व विशाल मंडपा मध्ये १६ x १२८ स्तंभ कलाकुसरींनी युक्त आहेत.
श्री दुर्गा सप्तशती नुसार करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही मुळ प्रकृती आदिमाया भगवती आहे. ती ना शिवपत्नी आणि ना ही विष्णूपत्नी आहे. ती साक्षात त्रिदेव देवींसह सृष्टीची जगतजननी आहे. कोलासुराचा वध करून ही मुळ आदिमाया आदिशक्ती करवीर नगरीत रममाण झाली. आणि कोल्हापूरांची आई अंबाबाई झाली.
प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती (३.०५ मी.उंच) लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभाऱ्यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालण्याऱ्या भाविक लोकांना त्रास होऊ नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना तसेच गाभाऱ्यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक शिवलिंग आहे. मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे. थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले त्या बांधकामाला एक लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. ज्याला गरुड मंडप किंवा सभा मंडप म्हणतात. तो इ.स. १८४४ ते इ.स. १८६७ या दरम्यान बांधण्यात आला. महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, स्वामी समर्थ, विठोबा, काशीविश्वेश्वर, राम, कात्यायनी, पंचगंगा व साती आसरा आणि राधा कॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत. देवळाच्या सभोवारच्या मोकळया जागेत फरसबंदी केलेली आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते. या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी(अंबाबाई) मंदिर म्हणजे सर्व देवतांचे माहेरघरच .
पूर्वी महर्षी दुर्वासांच्या शापाने देवांची सर्व संपदा समुद्रात बुडून गेली. म्हणून मंदार पर्वताची रवी करून त्याला वासूकीनागाच्या दोरीच्या साह्याने देवदैत्यानी सागर मंथन केले त्यातून जी चौदा रत्न प्रगटली त्यामधले एक रत्न म्हणजे भगवान विष्णूंचे अंश असणारे वैद्यांचे देव अर्थात धन्वंतरी!हातात जळू शंख चक्र आणि अमृतकुंभ धारण करणारे धन्वंतरी वैद्यकशास्त्राचे परमेश्वर म्हणून ओळखले जातात अशा या धन्वंतरींची द्विभुजा मूर्ती मणिकर्णिका तीर्थात मिळाली होती अशी आख्यायिका सांगण्यात येते.
असाही एक मतप्रवाह आहे---- कोल्हापूरची महालक्ष्मी नव्हे कोल्हापूरची अंबाबाईच..आदिशक्ती पार्वती
कोल्हापुरात अंबाबाईचे मंदिर आहे याची नोंद इतिहासात आहे.. अंबाबाई ही पार्वतीचे रूप आहे ..शंकराची पत्नी आहे.. या नात्याने कोल्हापुरातील मंदिर हे शैव मंदिर आहे.
पण अचानक 1980 सालापासून बालाजी वरून साडी चुडी अंबाबाईला पाठवू लागले यावरून असा प्रसार सुरू झाला की बालाजी आपल्या पत्नीला म्हणजे महालक्ष्मीला साडी चोळी पाठवतो.. नंतर अशी प्रथा रूढ झाली की बालाजीला दर्शनासाठी गेलेले कोल्हापूर महालक्ष्मी करूनच परत यावे.. कोल्हापूरची अंबाबाई ही महालक्ष्मी कशी झाली यावर संशोधन होणे गरजेचे आहे.. हे एकच मंदिर नाही *भारतात असे बहुतांश मंदिर आहेत जे शैव मंदिर असून सुद्धा त्यांना वैष्णव मंदिर बनवण्याचा प्रयत्न होत आहे..! आणि असे प्रयत्न का होत आहेत याचाही तपास होणे गरजेचे आहे
गेल्या काही काळापासून अंबाबाईचे पार्वती हे मूळ रूप बदलून तिचे लक्ष्मीकरण करण्याचा घाट घातला जात आहे .
करवीर निवासिनी अंबाबाई ही पार्वतीचे रूप आहे. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून अंबाबाई ही लक्ष्मीचे रूप असल्याचे सांगून काही लोकांकडून चुकीचा इतिहास रचला जात असल्याच्या तक्रारी अंबाबाईसंदर्भात मूर्ती व प्राचीन इतिहास संशोधकामार्फत केल्या जात होत्या. अंबाबाई ही तिरूपती बालाजीची पत्नी असून ती रूसून करवीरात आली आहे आणि आपल्या पत्नीसाठी दरवर्षी बालाजी महावस्त्र पाठवतो अशी आख्यायिकाही जोडली जात होती. मात्र *तिरूपती बालाजीची पत्नी ही अंबाबाई नसून पद्मावती असल्याचे अभ्यासकांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.
अंबाबाई मूर्तीची झीज झाल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर मूर्तीची अंबाबाई असल्याची ओळख दाखवणारी मस्तकावरील नागमुद्रा घडवलीच नसल्याचे उघड झाले. नागमुद्रा हे प्रतीक पार्वती अर्थात अंबा असल्याची खूण असताना नागमुद्रा न घडवल्याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले.* त्यामुळे अंबाबाई की महालक्ष्मी असा मतप्रवाहदेखील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नवरात्रोत्सवापूर्वी दोन महिने आधीच करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ स्वरूपाबाबत चर्चेला उधाण आल्यामुळे नवरात्रोत्सवात बालाजी देवस्थानकडून येणारा मानाचा शालू कोणत्या नात्याने स्वीकारला जाणार याबाबतही उत्सुकता होती,
या पार्श्वभूमीवर हा मानाचा शालू *‘विष्णूमाता’* या नात्याने स्वीकारला जात असल्याचे देवस्थान समितीतर्फे जाहीर केले.
अंबाबाई ही शक्तिरूप असून तिच्या मूर्तीमध्ये घडवण्यात आलेली आयुधे, नाग, सिंह, म्हाळुंग यामध्येच ती पार्वतीचे रूप असल्याचे दाखले असल्याचे डॉ. कुंभार यांनी स्पष्ट केले होते.* ही व्याख्यानमालिका कोल्हापुरात अखंड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आजपर्यंत देवीची नेमकी ओळख पुराव्यांमधून उजेडात न आल्यामुळे बालाजीची पत्नी म्हणून शालू स्वीकारला जात होता. मात्र, अभ्यासकांनी दिलेल्या दाखल्यानुसार अंबाबाई ही पार्वतीचे रूप असल्याची भूमिका देवस्थानने घेतली असून मुलाकडून आईसाठी महावस्त्र भेट म्हणून हा शालू यापुढे स्वीकारला जाणार आहे
कोल्हापूरची देवी महालक्ष्मी नसून अंबाबाई' आहे. याची कारण मीमांसा खालील प्रमाणे ---
१) कोल्हापूरची देवीचे नाव हे 'अंबाबाई' आहे. तिचे महालक्ष्मी नाव कधीच नव्हते. भारतामध्ये देवी आदिशक्ती सतीची ५२ शक्तिपीठे आहेत. त्यापैकी साडे ३ शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत. तुळजापुरची भवानी माता, माहुरगडाची रेणुका माता, कोल्हापूर ची अंबाबाई, आणि अर्धे शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी. जर कोल्हापूरची अंबाबाई शक्तीपीठ म्हटलं तर ती कधीच विष्णू पत्नी होणार नाही. कारण सतीची कलेची ५२ तुकडे ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी ५२ शक्तीपीठ तयार झाले. अंबाबाई ही शिवपत्नी आहे.
२) अंबाबाई च्या देवळात अंबाबाई च्या गाभाऱ्यावर पहिल्या मजल्यावर शिवमंदिर आहे. तिने शिवाची मातृका पिंड धारण केली आहे. अंबाबाई च्या मूर्तीचा अभ्यास केल्यास तिने कोणत्याही प्रकारे विष्णू चिन्ह परिधान केलं नाही आहे. उलट अंबाबाई मूर्ती जवळ वाहन सिंह आहे. सगळी शिवचिन्ह आहेत.
३) आता मुद्दा तिरुपती- अंबाबाई ह्या गैरसमज बद्दल.
काही वर्षपूर्वी काही तिरुपती भक्त आई अंबाबाई च्या ट्रस्ट च्या अधिकार कक्षेत आल्यामुळे त्यांनी ह्या चुकीच्या प्रथा पाडण्यास सुरवात केली.
आपण डोळसपणे पाहिल्यास असे लक्षात येईल की तिरुपती देवस्थान कडून शालू भेट देण्याची प्रथा सुरू केली. ही मागील २० वर्षातच चालू आहे (या अगोदर अशी कोणतीही प्रथा नव्हती), हे कमी की काय,
तिरुपती देवस्थान सारखे लाडू चा प्रसाद देण्याची सुरवात केली, ( या आधी लाह्या आणि बत्तासे चा प्रसाद मिळत असे).
अंबाबाई नाव बदलून महालक्ष्मी नाव पुढे केलं गेलं (२००० सालाच्या अगोदर एकही सरकारी कागदपत्रात महालक्ष्मी म्हणून कुठेही उल्लेख नाही. अगदी इंग्रजांच्या काळातली सुद्धा कागद पत्रात 'अंबाबाई' च उल्लेख आहे.
४) सर्वात महत्वाचे कोणत्याही दानव, राक्षस अधर्मी वृत्ती यांचा संहार माता पार्वती करते कारण ती आदिमाया जगदंबा आहे. तिने शस्त्र धारण केले आहेत. अंबाबाई ने या कारणास्तव कोल्हासुरचा वध केला आहे. लक्ष्मी माता ही संहारक नाही. ती धन पूरक देवता आहे. ती कोणाचा वध करत नाही.
५) शेवटचा मुद्दा श्रीविष्णू (तिरुपती) यांची पत्नी लक्ष्मी (पद्मावती) यांचे मंदिर तिरुपती पासून ५ किलोमीटर वर च आहे.
यावरून असा निष्कर्ष काढला आहे की- माता पार्वतीच्या शक्तीपीठ ला उगाच विष्णुपत्नीचे रूप देत आहेत.*
. रत्नासुराला मारण्यासाठी अंबाबाईने केदारनाथ जोतिबाला मदतीसाठी बोलावले होते . विष्णुला नाही . केदारनाथ शिवाला युद्धानंतर इथेच थांबण्याची विनंती केली .. ती मान्य केले . जोतिबा हे शिवाचेच रूप आहे .
अनेक अभ्यासकांची मते मांडली तरी ही महाराष्ट्रात माते स्वरूपात कुलस्वामिनी आहे पूज्य आहे भक्तांच्या नवसाला पावणारी आहे . शुभम भवतु
श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तीकः

No comments:
Post a Comment