Saturday, May 24, 2025

कलीयुगी दत्तभक्ती फलदायी

कलीयुगी दत्तभक्ती फलदायी



भजा भजाहो दत्तगुरु....कलीयुगी दत्तभक्ती फलदायी.

कलियुगी अत्रिपुत्र दत्तात्रय हेच साधकांवर कृपा छत्र धारण करणारे दैवत आहे, आणि त्यांच्या नाम  व पूजनाशिवाय दुसरा भक्तीमार्ग नाही. या जीवनाचा भार दत्त चरणी अर्पण करून ब्राम्हमूर्ती समर्थ पणे साधना करावी हीच सामर्थ्यवान बनवते एवढे सामर्थ्य नाम साधनेचे आहे. देहाची चारी अवस्था नामाच्या सह्याने व्यतीत करावी तरच मुक्तीच्या चारी अवस्था साधका समोर नतमस्तक होतील. सत्य संकल्प मनोरथ केवळ दत्त स्मरणाने पूर्ण होतील आणि जन्ममृत्यू च्या फेऱ्यातुन सहज बाहेर काढू शकतील. दत्तमहाराज हे स्मतृगामी आहेत ते भक्तांच्या आर्त हाकेला त्वरित धावून येतात फक्त आवश्यकता असते ती श्रद्धा व एकनिष्ठ उपासनेची .
दत्त उपासना कशी करावी..?

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. अशात दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत कोणतीही कृती नेमक्या कशा पद्धतीने करावी, या विषयी माहिती असणे आवश्यक आहे . दत्त संप्रदायात पावित्र्य व शुचितेला विशेष महत्त्व आहे .

💐दत्त पूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला  विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध  किंवा कुंकूम तिलक लावावा

💐दत्ताच्या मूर्ती किंवा फोटोला अनामिकेने सुगंधी गंध लावावे.

💐दत्ताला जाई आणि निशिगंधाची किंवा उपलब्ध सुवासिक फुले ही  अर्पित करावीत. फुलांचे देठ देवाकडे करत वाहावीत. दत्त हे ब्रम्हा विष्णू व महेश यांचे एकरूप दैवत असल्याने दत्त महाराजांना बेल , तुळस अर्पण करावी त्यातही देठ देवाकडे करावे .'विष्णुरूपी दत्त झाला ' म्हणून पिवळी फुले अर्पण करावी .

💐दत्ताला चंदन, केवडा, चमेली, जाई आणि अंबर हीना सुंगधी असलेली अत्तरे व त्याच सुगंधाची उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा यात धरून घड्याळाच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने तीन वेळा ओवाळावी.

💐दत्ताला हिना गुलाब वाळा हे सुगंध असलेले गंध अर्पण करावे.

💐गुरुवार हा दत्तांचा वार असल्याचे मानले जातं. या दिवशी दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले जाते.
उपवास करावा हार व सुवासिक फुले अर्पण करावी आर्तभावाने आरती व प्रार्थना करावी
आपल्या भावानुसार देवतांनी सगुणात येऊन कार्य करणे अवलंबून असते. दत्त हा ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत असल्याने इतर देवतांच्या तुलनेत तो कमी कालावधीत सगुणात येऊन कार्य करतो; म्हणून इतर देवतांच्या तुलनेत दत्ताची उपासना सुलभ आहे.

दत्त दत्त म्हणता वाचे। 
तेणे सार्थक जन्माचे॥
मने चिंतावा श्रीदत्त। 
अंतर्बाह्य पुर्ण भरित॥
दत्तरुप पाहे डोळा।
 तेणे भय कऴिकाळा॥

एका जनार्दनी जपा। मंत्र द्वयाक्षरी हा सोपा॥

नामस्मरा गुरुदत्तांचे तुमचे कार्य साधेल, मज प्रचिती आली बहू तुम्हा देखील येईल..! कलियुगात दत्त भक्ती त्वरित फळास येते

दत्त उपासकांसाठी काही नियम व पथ्ये भक्तांनी अवश्य पाळावीत

१. गुरुवारी शक्य तर उपवास करावा.त्या दिवशी कांदा, लसूण खाऊ नये. रात्री"श्रीदत्तवज्रकवच"तसेच, दत्तस्तोत्रे खड्या स्वरात म्हणून दत्ताची आरती करुन मगच उपवास सोडावा,
२. घरात दत्ताची तसबीर / दत्तमूर्ती असावी  मूर्ती देव्हाऱ्यात  वरच्या पायरीवर मध्यभागी ठेवावी तसबीर उत्तरेकडे तोंड करुन लावावी.
दर गुरुवारी दत्ताच्या तसबिरीला/ मूर्तीला-छातीला व चरण युगलांना अत्तर लावावे. हिना अगरबत्ती लावावी.शक्यतो एक गुलाबाचे फुल वहावे व पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा.
३. "त्रिपुरारहस्य"हा कल्याण कारी ग्रथं स्वत: विकत घेऊन वाचावा.तो देव्हाऱ्यात ठेवून त्यावर रोज गंध व फुले वहावीत.घरात शांती चिरकाल
टिकते.
४. घरी आलेल्या अपरिचितास विन्मुख पाठवू नये. किमान अन्नदान करावे. तसेच दर प्रौर्णिमेला गाईला गोग्रास व कुत्र्याला चतकोर तरी भाकरी घालावी.
५. भोजनास बसताना जमिनीवर बसू नये.पाट, चटई किवां एखादे वस्त्र तरी घ्यावेच.
६. मांसाहार शक्यतो वर्ज्य करावा व मद्यपान निषिध्द.
७. स्त्रियांनी मासिक पाळीत पुजा करु नये.
८. रोज निदान ११ वेळा तरी गायत्री मंत्राचा रोज जप करावा.
९. 'अलख निरंजन"हा भगवान गोरक्षनाथांचा आदेश लक्षात ठेवून दिवसातून एकदा स्वत:ला ' मी कोण ?' हा प्रश्न वाचारावा.
१०. "श्रीदत्तयंत्र" नित्य पूजेत ठेवावे.
११. काही विशेष कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी दत्ताच्या तसबिराला तसेच, दत्तयंत्राला नमस्कार करावा. काम हमखास होतेच प्रत्येक दत्तभक्ताने हे लक्षात ठेवावे...
१२. दत्तभक्ताने गुरुचरित्राच्या किमान 5 ओव्या रोज वाचाव्या व वर्षांतून किमान 2 ..3 गुरुचरित्र सप्ताह पारायण करावे दत्तजयंती, गुरुपौर्णिमा व नृसिंह सरस्वती जन्म.
३. दत्त भक्ताने विचार व आचार पवित्र ठेवावे कायम भक्तीयुक्त अंतः करण ठेवावे . खरे तर मन असे असावे ..
ऐकावे दत्त बोलावे दत्त 
करावे दत्त स्मरावे दत्त
दत्ता ने हे जिवन व्यापले
दत्ता विना न जिवनात दत्त 
प पूश्रीपंत महाराज, बाळेकुंद्री म्हणत ...

*दत्त नाम जपा*
परात्पर दत्त नाम जपा 
दत्त नामामृत निशिदिनी पिऊनी 
पहा आत्मरुपा 
अनन्यभावे भजता पाय 
करी दयानिधी कृपा 
भक्ती रहस्य प्रगट दावुनी 
हरी पुण्य पापा 
नित्य नैमित्य कर्मे करुनि 
नका भरू मापा 
उपासनेचे मर्म जाणुनी 
चुकवा जन्म खेपा 
*नित्य निरंजन दत्त देखुनि निरंजनी हरपा”*

दत्तमहाराज यांचे काखेतील झोळी ....
दत्तमहाराज भक्तांचे दुःख अपल्या झोळीत भक्तांची दुःखे घेतात व भक्तांना सुख समृध्दी देतात"दत्तप्रभूंच्या झोळीत एक दिव्य शक्ती, ती म्हणजे अन्नपूर्णा देवीचे आशिर्वाद". 

दत्तगुरुंच्या झोळीत एक अशी दिव्य शक्ती आहे जी भक्तांना समृद्धी व शांती प्रदान करते. ती दिव्य शक्ती म्हणजे "अन्नपूर्णा देवीचे आशिर्वाद". 

ही झोळी एक साधारण झोळी नसून, ती एक असामान्य, दिव्य झोळी आहे जी केवळ भक्तांसाठीच खुली आहे. यामध्ये भक्तासाठी आशीर्वाद, कृपा, प्रेम, करुणा, ज्ञान, दिव्यता, ऐश्वर्य, सुख, शांती, समृद्धी, निरंतर सहाय्य, संरक्षण, मार्गदर्शन, अध्यात्मिक उन्नती आणि शाश्वत मोक्ष आहे.  या झोळीत सर्व पापांचा नाश होतो, आणि भक्ताला जीवनातील कष्ट आणि अडचणींचा सामना करण्याची ताकद मिळते.

दत्तभक्त जेंव्हा शुद्ध मनाने आणि एकनिष्ठतेने दत्तगुरुंचा आश्रय घेतो, त्याला ज्ञान आणि अध्यात्मिक मार्गदर्शन मिळते. दत्तगुरुंची झोळी केवळ भौतिक आशीर्वादां पर्यंतच सीमित नाही, ती आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेनेही मार्गदर्शन करते. 

दत्तगुरुंच्या झोळीमध्ये एक आंतरिक शांती, योग्य दिशा, आणि आशीर्वाद असतात.
गुरुचरित्रातील आणि दत्तपुराणामध्ये अनेक कथा आहेत ज्यात दत्तगुरुंच्या आशीर्वादाने भक्तांच्या जीवनातील विकार आणि दुःख दूर झाले असुन त्यांना अध्यात्मिक मार्ग मिळालेला आहे.

भक्ताच्या जीवनात जेव्हा अंधकार, दुख, कष्ट, आणि शंका असतात, तेव्हा दत्तगुरुंच्या कृपेचा अनुभव त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. 'दत्तगुरुंची झोळी' म्हणजे एक असामान्य शक्तीची प्रतिमा आहे, जी त्यांच्या कृपेने भक्तांना समृद्ध, सुखी आणि दिव्य जीवन देणारी आहे. अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने भक्त केवळ भौतिक स्तरावर समृद्ध होत नाही, तर त्याला आत्मिक शांती, मानसिक स्थिरता आणि आंतरिक परिपूर्णता मिळते.
विशेषतः घरात सुख-शांती आणि अन्नाच्या अभावाच्या संकटातून सुटका होते.

दत्तगुरुंच्या कृपेने भक्तांना आध्यात्मिक ज्ञान मिळवता येते, तर अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने भक्तांची भौतिक आवश्यकताही पुरवली जातात.  दत्तगुरु आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आत्मज्ञान देतात, तर अन्नपूर्णा माता भौतिक जगात समृद्धी, आनंद, आणि स्थिरता प्रदान करतात.

"दत्तगुरुंची झोळी" आणि "अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद" यांचा एक विशेष संबंध आहे. दत्तगुरुंच्या झोळीत आध्यात्मिक ज्ञान, मार्गदर्शन, आणि आशीर्वाद असतात, तर अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादात अन्न, भौतिक सुख, समृद्धी आणि शांतीचा अनुभव होतो. या दोन्ही देवता एकमेकांना पूरक ठरतात, आणि त्यांची कृपा प्राप्त करणारा भक्त पूर्ण जीवनाचे अनुभव घेऊन समाधानी, समृद्ध आणि सुखी जीवन जागु शकतो.

दत्तात्रेय
दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक आहेत, जे एक हिंदू देवता म्हणून पूजले जातात.  त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात. भागवत पुराण, मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मांड पुराणसारख्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म, सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते, परंतु त्यांच्या जन्म आणि उत्पत्तीबद्दलच्या कथा मजकूरानुसार भिन्न आहेत. हिंदू धर्मातील वेदांत - योग परंपरेच्या ग्रंथांप्रमाणे अनेक उपनिषदे त्यांना समर्पित आहेत. हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक असलेली अवधूत गीता (शब्दशः, "मुक्त आत्म्याचे गाणे") ही दत्तात्रेयांना समर्पत आहे. 
: सदा विजयते श्री नृसिंह सरस्वती
*म्हणता दत्त दत्त । दत्त करी गुणातीत ।
*दत्तनामाचा निजछंद । नामें प्रगटे परमानंद ॥
सर्व भक्तांना विनंती त्यांनी 'श्री दत्त जय दत्त 'हा जप अखंड  करावा आपले कल्याण होईल .

No comments:

Post a Comment