Wednesday, August 13, 2025

शंखनाद का करतात ? त्याचे महत्त्व काय ? शंखनाद वर्ज्य कोठे आहे ?

 शंखनाद का करतात ? त्याचे महत्त्व काय ? शंखनाद वर्ज्य कोठे आहे ?


‘देवळात महादेवाची पूजा करतांना शंखपूजा उक्त नाही. मात्र आरतीपूर्वी शंखनाद विहित आहे आणि अवश्य केला जातो.’*

शास्त्र : शंखनादाने प्राणायामाचा अभ्यास तर होतोच; शिवाय शंखनाद जेथपर्यंत ऐकू जातो, त्या परिसरात भूत, पिशाच वगैरे वाईट शक्तींचा त्रास होत नाही.*

*दक्षिणावर्ती शंख.*
*तंत्र क्रियांमध्ये शंख उपयोगात आणला जातो. तंत्र शास्त्रामध्ये दक्षिणावर्ती शंखाला विशेष महत्व आहे. या शंखाची विधिवत पूजा करून घरामध्ये स्थापना केल्यास विविध प्रकारच्या बाधा नष्ट होतात आणि धनाची कमतरता भासत नाही. दक्षिणावर्ती शंखाचे अनेक लाभ आहेत, परंतु हा शंख घरामध्ये ठेवण्यापूर्वी याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे.*

*दक्षिणावर्ती शंखाचे शुद्धीकरण.*

*लाल वस्त्रावर दक्षिणावर्ती शंख ठेवून त्यामध्ये गंगाजल (गंगेचे पाणी) भरावे आणि आसनावर बसून खालील मंत्राचा जप करावा,*
*ऊँ श्री लक्ष्मी सहोदराय नम: या मंत्राचा कमीतकमी पाच माळ जप करावा आणि त्यानंतर शंख देवघरात ठेवावा.*

*दक्षिणावर्ती शंख धान्य भांडारमध्ये ठेवल्याने धान्य, धन भांडारमध्ये ठेवल्याने धन, वस्त्र भांडारमध्ये ठेवल्याने वस्त्रांची कमतरता भासत नाही. शयन कक्षामध्ये (झोपण्याच्या खोलीत) ठेवल्यास शांततेचा अनुभव होतो.*

*यामध्ये शुद्ध, पवित्र पाणी भरून व्यक्ती, वस्तूवर शिंपडल्याने दुर्भाग्य, अभिशाप, तंत्र-मंत्र इत्यादींचा प्रभाव समाप्त होतो. कोणत्याही प्रकारचे वाईट तांत्रिक प्रयोग या शंखाच्या प्रभावासमोर निष्फळ होतात. दक्षिणावर्ती शंख असेलेल्या ठिकाणी धनाची कमतरता राहत नाही. दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवल्याने सर्व प्रकारची नकारात्मक उर्जा स्वतः नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.

No comments:

Post a Comment