||ओम गं गणपतये नमः|| गणेशोत्सव
विशेषपुष्प १४

गणपतीला शेंदूर , शमी व दुर्वा का वाहतात ? यामागे काय कथा आहेत ?
शमी का वाहतात : सामान्यतः शमीच्या झाडाची पाने शनिदेवाला अर्पण करतात. परंतु या झाडाचे पान महादेव आणि श्रीगणेशालाही अर्पण करू शकता. श्रीगणेश पूजेने घर-कुटुंब आणि धन संबंधित सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात. या झाडाची पाने श्रीगणेशाला दुर्वाप्रमाणेच प्रिय आहेत. मान्यतेनुसार या झाडामध्ये महादेवाचा वास आहे. गणेश उत्सव काळात गणपतीला शमीचे पाने अर्पण केल्याने बुद्धी तल्लख होते आणि सर्व दुःख दूर होतात. मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते. काही ज्ञानी व शास्त्र अभ्यासक यांच्यानुसार श्रीगणेश पूजेमध्ये शमीच्या पानांसोबत तांदुळ, फुल आणि शेंदूरही अर्पण करावा.या दरम्यान खालील मंत्राचा उच्चार करावा...
मंत्र-
त्वत्प्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वै।
शमी दलानि हेरम्ब गृहाण गणनायक।।
श्रीगणेशाला
शेंदूर अर्पण का करावा?
त्वत्प्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वै।
शमी दलानि हेरम्ब गृहाण गणनायक।।
विविध
देवी-देवतांच्या पूजेमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या सामग्रीमध्ये शेंदूराचेही विशेष महत्त्व आहे. विशेषतः शिव
कुटुंब आणि महादेवाच्या सर्व
अंश अवतारांवर शेंदुर अर्पण करण्याचे महत्त्व आहे. यामागील मान्यता
अशी आहे की, शेंदूर
महादेवाच्या तेजापासून उत्पन्न झालेल्या पारा धातूपासून बनते. महादेवाचे पुत्र शिगणेशाला शेंदूर अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण
होतात. खालील मंत्राचा उच्चार करत श्रीगणेशाला शेंदूर
अर्पण करावा..
मंत्र-
सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्।
शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्।।
सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्।
शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्।।
दुर्वांची
महती काय आहे ? किती
वाहव्या ?
दुर्वांशिवाय गणेश पूजन अपूर्ण; , महत्त्व, मान्यता आणि कथा
: महादेव शिवशंकरांच्या पूजेत बेलाच्या पानाला महत्त्व आहे; श्रीविष्णूंच्या पूजेत तुळशीच्या पानांना महत्त्व आहे; त्याचप्रमाणे गणपती पूजनात दुर्वांना अत्याधिक महत्त्व आहे. गणपती दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती पूजन पूर्ण होत नाही. पूजेचे पुण्य प्राप्त होत नाही, असे सांगितले जाते. दुर्वा पूजनात एवढी का महत्त्वाची आहे? जाणून घेऊया...
माघ महिन्यातील गणेश जयंतीनंतर भाद्रपद चतुर्थीला महादेव शिवशंकरांनी सर्वप्रथम गणेशोत्सव साजरा केला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. वास्तविक पाहता प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षातील चतुर्थीला गणेश पूजनाची परंपरा आहे. मात्र, अनेकार्थाने भाद्रपदातील चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. यंदा ,शनिवार ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थी साजरी होत आहे.
अनलासुर समोर जे दिसेल ते खात सुटला. सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले. विष्णूंनी सर्व देवतांना अभय दिले. तेवढ्यात तेथे अनलासुर आला. त्याला पाहिल्यावर विष्णूही घाबरले. त्यांनी गणपतीचे स्मरण केले. गणपती बालकाच्या रूपाने विष्णूंपुढे प्रकट झाला. हे विष्णू, आपण माझे स्मरण का केलेत, असे विचारत असतानाच अनलासुराने काही देवांना पकडले. सर्व देव आणि ऋषीमुनी सैरावैरा पळू लागले. गजानन मात्र जागचा हलला नाही. मग अनलासुराने गजाननाकडे मोर्चा वळवला. त्याने गजाननाला गिळण्यासाठी आपल्या पंज्यांनी उचलले. तो गणपतीला गिळंकृत करणार तोच सर्व देवांनी हाहाःकार केला. अनलासुराच्या हातातील त्या बाल गजाननाने एकदम प्रचंड रूप धारण केले. ते रूप फारच विराट होते. त्याचे डोके आभाळाला भिडले. पाय पाताळात रुतले होते. एका क्षणात गजाननाने अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले.
अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. गणपतीला खूप त्रास होऊ लागला. गणपती स्वःच त्रासात आहे, असे समल्यावर देव, ऋषी, मुनी या सर्वांनी त्यांना जमतील ते उपचार सुरू केले. गणपतीच्या अंगाचा दाह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे, म्हणून अनेक औषधी वनस्पतीचा उपयोग करणे सुरू झाले. वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याचा अंगावर करण्यास प्रारंभ केला. नीलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाग काढून त्याचा गळ्यात घातला. इंद्राने चंद्र गजाननाच्या मस्तकावर ठेवला. परंतु कशाचाही उपयोग होईना.
ब्रम्हदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन्ही कन्या त्याच्या सेवेसाठी उभ्या केल्या. वाळ्याच्या पंख्याने त्या गणपतीला वारा घालू लागल्या. पण कशाचाही उपयोग होईना. गणपतीच्या अंगाचा दाह होत राहिला. गणपतीच्या अंगाचा दाह होत आहे, ही वार्ता सर्वत्र पसरल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ८८ हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी २१ दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे बनले. गजानन म्हणाला की, माझ्या अंगाची आग या दुर्वांमुळे नाहीशी झाली. म्हणून मला दूर्वा अर्पण करणाऱ्या व्यक्तींची सर्व पापे नष्ट होतील. ती व्यक्ती बुद्धिमान होईल. असा गणपतीने वर दिला .
हे गणेश पुष्प गिरिजात्मक गणपती चरणी विश्वकल्याणाचे कामनेसह श्रद्धापूर्वक समर्पण .
|शुभम भवतु ।
कल्याण मस्तु ।।
%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80.jpeg)



.jpeg)



.jpeg)