Saturday, July 26, 2025

श्री नृसिंह सरस्वती स्वामी व श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी .. चरित्र व कार्य

श्री नृसिंह सरस्वती स्वामी व श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी ..  चरित्र व कार्य


दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ व दुसरे अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी भक्ताला वचन दिल्याप्रमाणे विदर्भातील ‘कारंजा’ या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी ‘नरहरी’ या नावाने सन 1378मध्ये त्यांनी जन्म घेतला. त्यांनी जन्मतःच ॐकार उच्चारून सर्वांनाच आश्चर्यचकित केले व मौंजीबंधनापर्यंत मौन धारण करून मौंजीबंधनानंतर चारी वेद बोलून दाखविले. नंतर बद्रिकावनात तपश्चर्या करून काशी येथील ‘श्रीकृष्ण सरस्वती’ यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली व गुरूंच्या आज्ञेने तीर्थाटन करीत सन 1421मध्ये ते औदुंबर (जि. सांगली) व सन 1422मध्ये श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दाखल झाले. येथील शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती या नद्या मिळून झालेली पंचगंगा, तसेच कृष्णा व वेण्णा या सात नद्यांच्या पवित्र संगमावर औदुंबर वृक्षतळी महाराजांनी बारा वर्षे तपसाधना केली व कृष्णेच्या काठावर असलेली आठ तीर्थे भक्तोध्दाराकरिता प्रकाशात आणली. महाराजांच्या तपसाधनेनेच या गावाला ‘नृसिंहवाटिका’ व पुढे ‘नृसिंहवाडी’ हे नामाभिधान प्राप्त झाले. महाराजांनी नृसिंहवाडीतून गाणगापूरला जाताना साधारण सन 1434 साली येथे ‘मनोहर’ पादुकांची व अन्नपूर्णा जान्हवी देवतांची स्थापना केली. ”मनोहर पादुकांच्या रूपाने आपण येथे सदैव वास करू” असा महाराजांनी भक्तांना आशीर्वाद दिला व श्रीभेरंभट नावाच्या तत्कालीन पुजाऱ्यांना पादुकांचे अर्चन करण्यास सांगितले. ते निपुत्रिक असल्याचे समजल्यावर, ”औदुंबर वृक्षाप्रमाणे तुमचा वंश बहरेल” असा आशीर्वाद दिला. त्यांच्या आशीर्वादाप्रमाणे, श्रीभेरंभट    यांची 19 ते 20वी पिढी महाराजांनी स्थापन केलेल्या मनोहर पादुकांची आजही निष्काम व शुध्द आचरणाने त्रिकाळ पूजा करीत आहे..


श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी 

श्रीक्षेत्र गाणगापूर ला श्री गणेश शास्त्रीबुवांनी दत्तोपासना केली तेव्हा दत्तप्रभूंनी त्यांना दृष्टांन्त देऊन आता गाणगापूर ला येण्याची आवश्कता नाही मीच आपल्या घरी पुत्र रूपाने  येत आहे त्यानुसार 
भक्ताला वचन दिल्यानुसार श्री गणेशशास्त्री व सौ रमाबाई यांच्या पोटी माणगांव क्षेत्री दत्तरूपाने वासुदेवाचा जन्म झाला  वयाच्या आठव्या वर्षी मौजीबंधन संस्कार केले आचार्यानी प्रणवाचा  व गायत्री मंत्राचा तीन वेळा ऊच्चार मुखावाटे वदवून घेताच वासुदेवाच्या शरीरातून एक दिव्य प्रवाह चमकून गेला त्याचे सर्वांग शहारले व त्याला वेदमातेचे दर्शन झाले ..जणू गायत्री मातेने प्रत्यक्ष आशिर्वाद दिला .. नंतर  गंगाखेडयेथे संन्यास व ऊज्जैन ईथे क्षिप्रा नदी काठी दत्त मंदीरात सदगुरू श्री नारायणानंद सरस्वती स्वामी य़ांचे कडून दंड ग्रहण केलादंड ग्रहणानंतर संपुर्ण भारतभर पायीच संचार केला ईश्वरनिष्ठा व स्वधर्मनिष्ठा ची जनजागृती केली .दंड  ग्रहण केल्यानंतर संपुर्ण भारतभर भ्रमण करून विविध ठिकाणी विविध प्रांतात त्यांनी एकुण तेविस 
चातुर्मास केले .ह्या काळात त्यांनी संन्यासाश्रमाच्या आचारधर्माचे काटेकोर पालन केले . वेळोवेळी त्यांना दत्त प्रभूंचे मार्गदर्शन मिळत होते भ्रमण काळात सर्वप्रथम कारंजा हे स्थळ श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे जन्म स्थळ आहे हे त्यांनी जगाला दाखवून दिले त्यानंतरच महाराजांचे जन्मठिकाण म्हणून दत्तक्षेत्र कारंजा नावरूपाला आले श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या आदेशानुसारच श्री ब्रम्हानंद सरस्वती स्वामींनी तिथे मंदीर व मुर्तीची प्रतिस्थापना केली .श्री क्षेत्र पीठापूरम हे  श्रीपाद श्रीवल्लभ यांची जन्मभुमी पीठापुरम आहे हे तेथिल जनतेला 
सांगितले.श्रीनृसिंह सरस्वती स्वामी व श्रीपाद श्रीवल्लभ या दत्तावतारींचे जन्मस्थळे ही स्वामी महाराजांनी नावरूपाला आणली .पुढे कुरवपूर येथिल आपल्या चातुर्मासात  कुरवपूर ही श्रीपाद श्रीवल्लभ यांची कर्मभुमी आहे हे गाववासीयांना सागितले . 
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी अनेक चमत्कार केले अनेकांना  व्याधी मुक्त केले. बालपणीच त्यांनी आपल्या मंत्र सामर्थानी द्वाड गाय शांत तर केली व  दुभती केली .अनेकांचे त्वचा रोग पोट दुखीचे विकार बरे केले .अनेकांच्या पिशाच्च बाधा दुर केल्या .पाऊस येणार हेही भाकीत वर्तवित होते .आपल्या गरीब भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी वाडी मध्ये सात रूपयाच्या सामानात तयार झालेल्या अन्नावर आपली छाटी अंथरून दोन हजार माणसे जेऊन ऊठली तरी अन्न जेवढ्याला तेवढेच शिल्रक राहीले .हावनूर येथिल चातुर्मास मुक्या मूलाला श्लोक म्हणावयास लावले व तो बोलू लागला .तंजावर येथिल चातुर्मासात मृत बालकाच्या अंगाला भस्म चोळल्यावर ते जिवंत झाले . असे अनेक चमत्कार महाराजांनी केली .एवढ्या सर्व विद्या व सिद्धी अवगत असतांना ही त्याचा ऊपयोग त्यांनी लोक कल्याणासाठीच केला स्वतासाठी त्यांनी त्याचा ऊपयोग कधीच केला नाही.

श्री नृसिंह सरस्वती स्वामी व श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांच्या जीवनपटाकडे पाहल्यास एक लक्षात येते की या दोन्ही दत्तावतारी पुरूषाच्या जीवनात बरेच साम्य आहे . श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी जसे चमत्कार दाखवले तसेच बरेच च श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी दाखवले अर्थात श्री नृसिंह सरस्वतीनी अनेक चमत्कार दाखवले कारण ती त्या काळाची गरज होती श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी दत्तोपासनेचा प्रचार भारतभर केला.

श्री नृसिंह सरस्वती स्वामी हे ईश्वर रूप होते तर श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी हे आजच्या काळातील मानवरूपी श्री नृसिंह सरस्वती स्वामी होते.
   ।। श्री गुरूदेव दत्त ।।


No comments:

Post a Comment