आयुष्यावर बोलू काही... काळजीपूर्वक वाचा व समजून घ्या.
अत्तराची बाटली कितीही सुगंधित असली, तरी त्यावर फुलपाखरे कधीच बसत नाहीत, त्यांनाही खरं आणि खोटं यातील फरक कळतो.
त्याप्रमाणे*आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने, आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं..


आयुष्य जगण्याच्या २ पध्दती:
पहिली - जे आवडते ते मिळवायला शिका.
दुसरी - जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका.
एक नेहमी लक्षात असू ध्या, आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत. चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत...चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जीवनभर टिकून राहतात...
आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे.

कर्तृत्व नसलेली माणसे दुसऱ्यांची "थट्टा " करण्यात मात्र नेहमीच lपुढे असतात.
माणसाचं वागणं नितळ असलं, की त्याचं प्रतिबिंब कुठेही आणि कितीही गर्दी असली तरी ते उठूनचं दिसतं...
जिवंत असताना एकटेपणा आणि मेल्यावर जमणारी बिनकामी गर्दी... माणसाच्या जगण्यापेक्षा मरण्याला जास्त किंमत आणि अर्थ देवून जाते...!


*ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही, त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे.

*स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही, तसेच माणसाच्या मनाचा तळ समजला तर, त्याच्या सहवासात राहण्याची भीती वाटत नाही.*

*कारण सांगणारे लोक, यशस्वी होत नाहीत. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. जिंकायची मजा तेव्हाच आहे, जेव्हा अनेकजण तुमच्या पराभवा ची आतुरतेने वाट पाहत असतात.

सुखाच्या शोधात, माणूस आयुष्यभर फिरत असतो. पण दमल्यावरच त्याला जाणीव होते की, समाधानातच सुख आहे. जिभेला जरी हाड नसलं, तरी ती दुसऱ्याच्या भावना, सहज तोडू शकते ! तेव्हा आपल्या शब्दांबाबत, जागरूक राहून ते वापरा ! आनंदी राहण्याचा अर्थ हा नाही की, सर्व काही ठीक आहे. याचा अर्थ हा की, तुम्ही तुमच्या दु:खावर, मात करुन जगणे शिकलात. थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव. जो दिसतही नाही, आणि भेटतही नाही, पण मनापासुन श्रद्धेने, आणि ताकदीने हाक मारा, धाऊन आल्याशिवाय राहत नाही! अहंकार कोणालाच चुकलेला नाही. त्याचे पण दोन चेहरे आहेत, एक "स्वाभिमान" व दुसरा "गर्व". अहंकाराचे रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होते, तेव्हा "कर्तृत्व" जन्माला येते. आणि अहंकाराचे रूपांतर, जेव्हा गर्वात होते, तेव्हा ते "विनाशाला" निमंत्रण देते. आवश्यक्तेपेक्षा जास्त मिळतं,* *त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं, त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडे कमी असूनही आनंद देतं, त्याला आयुष्य म्हणतात...!!*
आपुलकीच्या शब्दानी माणसाच्या मनातील जखम बरी होते...... आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो........
आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही...!!!

साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे . क्षमा ही परम शक्ती आहे . नम्रता हा सर्वोत्तम युक्तीवाद आहे . आणि ओळख हा चांगला संबंध आहे . फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे . मग तो पैसा असो की माणसे !!!.

दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे, दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ सद्गुरू असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल; म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने सद्गुरू नाम घ्यावे, आणि सद्गुरूंच्या अनुसंधानात राहावे.


या आयुष्यातील एक निर्विवाद सत्य आहे कि जो माता पित्याचा आदर करतो , सद्गुरूंना भक्ती व श्रद्धेने समर्पित असतो व जो भगवंताच्या अनुसंधानात राहतो तो कायम यशस्वी व सुखी असतो म्हणून एकच प्रार्थना सतत दत्तनामात राहा .
❝ आपला दिवस आनंदात जावो ❞

No comments:
Post a Comment