![]() |
| कुरवपुर |
कुरवपुर एक दुर्गम पण जागृत दत्तक्षेत्र
दुर्गम श्रीपाद श्री वल्लभांची तपोभूमी ..
कुरवपुर ला येणे सर्वानाच आवडते परंतु तीथे सुख सुविधा नसल्यामुळे भक्त लोकांना तीथे रहायला आवडत नाही परंतु तीथे सुख सुविधा नाहीत अन्नछञ नाही हाँटेल्स नाहीत या साठी कोणीही व्यक्ती जबाबदार नाही तीथे विराजमान असल्यालेल्या परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूना या गोष्टी नको आहेत त्यांची ईच्छा नसल्यामुळे अजूनही या गोष्टी बनू शकल्या नाहीत 1980 साली कुरवपुर च्या कृष्णा नदीवर सरकार कडून पुल मंजूर झाला आहे तरीही आज 44 वर्ष झाली तरी तो पुल पुर्ण होऊ शकला नाही आहे याचे कारण एकच आहे की परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूना वाटते इथे गर्दी वा गोंधळ वाढायला नको कारण इथे गर्दी वाढली तर इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पुर्ण कराव्या लागणार तसेच चांगल्या भक्तांच्या बरोबर वाईट भक्त सुद्धा परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे दर्शन घेणार आणि परमात्मा हेच नको आहे परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंची ईच्छा आहे फक्त निवडक निस्सीम श्रद्धा असलेल्या भक्तानाच दर्शन देण्यासाठी कुरवपुरात बोलावावे जे लोक भाग्यवान आहेत ज्यानी आपल्या भक्तिने मागिल जन्मी परमात्मा प्राप्ती केली आहे अश्या भाग्यवान पुण्यवान भक्तानाच परमात्मा कुरवपुर मध्ये बोलवतो, कुरवपुर मध्ये जाणे सोपे नाही आहे इथे जाण्यासाठी अनेक जन्माची भक्ती फळास यावी लागते इथे जाण्यासाठी अनेक जन्माची सत्कर्माची पुंजी असावी लागते तसेच इथे जाण्यासाठी प्रबळ ईच्छा असावी लागते व परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ भेटण्यासाठी तीव्र ओढ असावी लागते त्यांच्या वर श्रद्धा असावी लागते तेव्हाच तीथून आपल्याला बोलवणे येते परंतु तीथे जाण्यासाठी ऐवढ्या गोष्टी का बघीतल्या जातात..? तर त्याचे उत्तर आहे हे कलियुग आहे इथे भक्त प्रल्हादा सारखे भक्त आहेतच तसेच हिरण्यकश्यपु सारखे सुद्धा आहे आणि परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूना फक्त भक्त प्रल्हादा सारखेच भक्त प्रिय आहेत त्यामुळे त्यानाच आपले दर्शन घडावे,आपण इथेच आहो याचा सुद्धा अनुभव यावा म्हणून तर इथे येण्यासाठी खुप गोष्टी बघीतल्या जातात, म्हणून कुरवपुर या ठिकाणी जे जे जाऊन आलेत व ज्यानी ज्यानी भगवंताचे कुरवपुर मध्ये जाऊन दर्शन घेतले आहे ते सर्वजण धन्य आहेत तेच या कलियुगातील भगवंताचे प्रिय भक्त प्रल्हाद आहेत . तेच श्री श्रीपाद वल्लभ यांना प्रिय आहेत.
आता प्रथम पाहू श्रीक्षेत्र कुरवपूर ...कसे जावे ? इथे दुर्गम क्षेत्री पुजारी कसे आले ? श्रीपाद आश्रम पंचदेव पहाड काय आहे ?
१ ) या क्षेत्री असे जावे
कुरवपूर (जि. रायचूर) कर्नाटक (KURAVPUR)-
हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावरआहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे. याक्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले. श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या अठराअक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला. याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे. याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला.
मुंबई, बंगलोर (व्हाया गुलबर्गा) या रेल्वेमार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते. तिथे उतरून रायचूर बसस्थानकावरून बस मार्गाने ३० कि. मी. अंतरावर अतकूर हे गाव लागते.तिथे जवळ्च कृष्णा नदीचा तीर लागतो. होडिने १ कि. मी. प्रवास करून मंदिरापर्यंत जाता येते. दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबादया बसमार्गावर मतकल नावाचे गाव लागते. तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ कि. मी. अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तिरावर असलेल्या गावास जावे लागते. नंतर होडिने प्रवासकरून १ कि. मी. अंतरावर मंदिरापर्यंत पोहोचतायेते. हा मार्ग अधिक सोयीचा आहे. पंचदेव पहाड यागावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे.
२) कुरवपूरचे अर्चक अर्थात पुजारी कसे आले ?
नारायण महाराज नावाचे एक ग्रहस्थ होते. त्यांचे वरचेवर कुरवपूर या स्थानी येणे जाणे होते. तेथील सर्व परिस्थिती त्यांना माहित होती. म्हणजे मंदिरातील पुजे पासून ते पुजारी लोकांच्या पर्यत म्हणजे सर्व माहिती असणारे असे ते नारायण महाराज होते. एकदा ते असेच एका गावी गेले व त्या गावातील एका मंदिरात गेले. तेव्हा त्या गावातील मंदिरात नेहमी असणारे पुजारी नव्हते. त्याजागी त्या पुजाऱ्याचा पुतण्या, केशव हे सर्व करत होता. नारायण महाराजांनी बारीकपणे त्या केशव पुजाऱ्याचे कार्य पाहिले. केशव पुजारी हे आपल्या काकांच्या म्हणजे गोविंद पुजाऱ्याच्या हाताखाली तयार झाल्यामुळे अगदी व्यवस्थित कोणतेही गोंधळ न करता मंदिरातील सर्व पुजा-अर्चा अत्यंत चोख पार पाडली. भजन, कीर्तन, पालखी, गायन अत्यंत छान केले. आणि त्याचा प्रभाव श्री नारायण महाराजांच्यावर पडला. त्या राञी नारायण महाराजाना झोप पण आली नाही. त्यांच्या मनात एक विचार सूरू होता. तो विचार घेऊन दुसरे दिवशी ते मंदिरात पोहचले. त्यांनी केशव पुजाऱ्यांच्याकडे त्याच्या आई वडीलांच्या बद्दल चौकशी केली तेव्हा कळाले, त्यांचे आई वडील इथून तीन मैल अंतरावर असलेल्या एका गावात रहातात.
नारायण महाराज केशव पुजारीच्या वडीलांना म्हणजे रंगभटजीना भेटायला त्यांच्या गावी गेले. जेव्हा ते रंगभटजीना भेटले तेव्हा ते म्हणाले, "श्री दत्ताञेयांच्या प्रेरणेने मना मध्ये अकस्मात एक संकल्प निर्माण झाला आहे. आणि मला खाञी आहे हा मूळ संकल्प माझा नसून तो परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभांचा आहे. मी फक्त निमित्त आहे !" असे बोलून ते पुढे म्हणाले "रायचूर पासून २० मैला वरती कुरूगड्डी नावाचे एक गाव आहे. या कुरूगड्डी गावात दत्ताञेय प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे अतिशय पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरातील सर्व पुजा अर्चा तेथील दोन ब्राम्हणच करतात. पण त्या दोन्हीही ब्राम्हणांची लग्न होऊ शकलेले नाहीत. दोन्ही ब्राम्हण वृद्ध झालेले आहेत आणि मंदिरातील पुजा अर्चा पुढेही सूरू ठेवायची आहे. त्यासाठी आपण आपल्या मुलाला म्हणजे केशवला आम्हाला दत्तक देता का ? आम्ही त्याला कुरूगड्डी मधील पुजारी बनवतो." असे बोलून त्यांनी विनंती केली. तेव्हा केशव पुजारींच्या आई म्हणाल्या "कुठ ते निर्जन ठिकाण ? अनोळखी ठिकाण ? खुप दुर असलेले ते स्थान, अपरिचित लोक ! त्यामुळे मी माझ्या मुलाला दत्तक देणार नाही ! मी माझा मुलगा देणार नाही, माझा मुलगा मला जड झालेला नाही. आम्ही त्याचे पालन पोषण करणेस समर्थ आहोत." तेव्हा नारायण महाराज खुप नाराज झाले व तिथून निघून गेले.
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या आज्ञेने आणि आशिर्वादाने आश्रमात नित्य अन्नदान चालू आहे. डिसेंबर 2007 पासून ते 2014 पर्यंत पांडुरंग स्वामी मंदिरात नित्य अन्नदान चालू होते. नंतर दि. 03-05-2014 पासून श्रीपाद छाया आश्रमाची पक्की इमारत बांधली तेथे सुद्धा नित्य अन्नदान चालू आहे. रोज 200 गरीब मुले, अनाथ, वृद्ध लोक जेवायला असतात. अन्नासाठी तळमळणार्यांना अन्न दिल्यास त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ आहे. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भोक्ता हे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. दत्त संप्रदायात असे सांगितले गेले आहे की जेथे अन्नदान चालू असते तेथे स्वामी सूक्ष्मरुपात येत असतात.
नंदिनी गो-शाळेत 50 गाई आहेत. येथून आलेल्या दूधाने देवळात अभिषेक होतो आणि अन्न दानांत वापरले जाते.आपल्या पुराणात गोपूजेला खूप महत्व दिले आहे. हिंदू परंपरेत गायीची पूजा करण्याची प्रथा आहे. याला गोपूजा म्हणतात. पुराणात सांगतात की चार समुद्र गाईच्या दूधात आहेत. वैदिक विद्वान म्हणतात की गायीच्या सर्व भागामध्ये सर्व जग लपलेले आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष मिळवण्यासाठी गायीची उपासना केली पाहिजे.
येथे श्रीपाद श्री वल्लभ गुप्त रूपाने उपस्थित आहेत .प्रत्येक दत्तभक्तांनी पुण्य अर्जित करून येथे दर्शनास येऊन पुण्यसंचय करावा
।। शुभम भवतु ।।

No comments:
Post a Comment