ज्याचे प्रपंचात भगवंत आहे तोच परमार्थ ....
ज्याचे कोणी नसते, त्याचा भगवंत असतो, आणि तसे पाहयला गेले तर भगवंता शिवाय आपले कोणीच नसते, अगदी कोणी म्हणजे कोणीच नसते.*
म्हणून जो आपला आहे,(भगवंत)त्याच्यावरच जास्त प्रेम करावे, त्यालाच जीव लावावा, आणि त्याच्याच छत्र छायेत रहावे.*
मणुष्य अगदी लबाड आहे, अगदी तो आपला कितीही जवळचा असो, अथवा रक्त नात्यातला असो तरी ही तो लबाडच असतो. स्वार्थ साधत असेल तरच तो आपल्याशी सलगी ठेवतो,आणि समाज्याच्या भितीने नाते टीकवतो.पण भगवंत हा निस्वार्थी व अत्यंत प्रेमळ व दयाघन असल्या कारणाने सर्व सोडून गेल्यावरही तो आपल्याला अगदी शेवटच्या स्टेप पर्यंत नव्हे नव्हे जन्मोन् जन्मी ही सोडून जात नाही, उलट माणूसच संसारीक गोष्टींपायी त्याला विसरतो, तरीपण भगवंत माणसाला कधीच एकटा सोडत नाही.
म्हणून भगवंताशी कृतज्ञ असावे, त्याच्या नामाचा आधार घेऊन नेहमी त्याचे स्मरण व लीला मय आयुष्य (अवतारचे) अनुभवत रहावे."*
खरा मी म्हणजे देह नव्हे. पण देह माझा म्हणताना "मी देह" असे म्हणतो व
वागतो. मी देह आहे हे एक टोक व मी तो आहे हे दुसरे टोक.
जितके एकीकडून दूर, तितके दुसरीकडे जवळ. हे जवळपण सहवासाने आले.
सहवासाने मी जसा देह झालो तसा भगवंत कां होणार नाही? नामस्मरण हे त्यासाठी आहे. देहाचा विसर पडायला दुसर्याचा आठव पाहिजे. सर्व मार्ग त्यासाठी आहेत.
मी चोवीस तास भगवंताचाच आहे. मी जन्मापूर्वी त्याचा होतो, मागून त्याचाच होणार.मग मध्ये मी त्याचाच असलो पाहिजे हे असे अनुसंधान पाहिजे.
प्रपंचात संकटातून कसे बाहेर पडाल?
तर मुंगी पाण्यात पडली तर न घाबरता जीव वाचविण्याकरिता सर्वत्र निरीक्षण करते. पाण्यावर तरंगणारे पान किंवा गवताची काडी दिसताक्षणीच पानाचा आधार घेऊन किनाऱ्यावर येते.
संसारात आर्थिक संकटे, असाध्य रोग, बेकारी, मुलीच लग्न न जमणे आणि शत्रूपिडा अशी संकटे येत असतात. अशावेळी जवळची माणसही मदतीचा हात देत नसतात.
अशा प्रतिकूल परिस्थितीत कठोर परिश्रमाने नोकरी किंवा कुशलतेने व्यापार करून अधिक धन कमवावे.
जीवनात श्रमा बरोबर यश मिळविण्याकरिता उपासना करून ईश्वर कृपा प्राप्त करावी लागते. आपल्या शरीरीक आणि बौद्धिक शक्ती बरोबर भक्तीद्वारे ईश्वर साह्य मिळविण्याची गरज असते.
दृढ श्रद्धा आणि दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आपल्या शास्त्रात संकट मोचक मंत्र दिले आहेत. विष्णू सहस्त्र नाम, रामरक्षा, हनुमान आणि दत्त गुरुंची स्तोत्रे आहेत. अधिकारी आणि अभ्यासू पुरुषांकडून तारक मंत्र आणि मंत्रविधी माहीत करून श्रद्धेने अनुष्ठान केल्यास मानसिक बळ आणि संकटाची तीव्रता कमी होऊ शकते
म्हणून आसक्ति फक्त भगवंताची असावी.
कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये. प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात. धर्माला विधींची फार जरुरी असते. विषयसुद्धा आम्ही विधीने भोगतो. आम्ही गंगेवर स्नानाला जातो असे म्हणतो. खरोखर, मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकते. तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर त्या स्नानाचा काय उपयोग ? नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर काय उपयोग ? कर्माची बंधने तुटावीत म्हणून शास्त्राची बंधने पाळावी लागतात. देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की, माझा लोभ कमी व्हावा. खरे म्हणजे, आपल्याला कर्म केल्याशिवाय करमतच नाही. पण आपण फळाची आशा उगीचच करीत बसतो; इथेच आपले चुकते. काहीही न करता राहणे मनुष्याला शक्य नसते. उदाहरणार्थ, एखाद्याला सांगितले की, हातपाय न हलविता, काही न करता, स्वस्थ रहा, तर ती त्याला शिक्षाच होईल. जर काही तरी करणे जरूरच आहे, तर उचितच गोष्ट करावी. जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते. कर्तेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म हे असे विपरीत कर्म होय. ज्ञानावस्थेमध्ये झालेले कर्म पूर्णच असते. त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही. धर्म तरी काय सांगतो ? तर प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे. पण कर्तव्य तरी कशासाठी करायचे ? तर ते भगवंतासाठी होय. भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावे, तरच मानव सुखी होईल.
सुधारणांनी सोयी केल्या, म्हणजे देहसुख वाढविले. त्याने परावलंबित्व मात्र आले; आणि परावलंबनात खरे सुख नाही. लौकिक विद्या ही खरी विद्या नव्हे, अविद्याच ती. विद्येने एक समाधान तरी मिळाले पाहिजे, किंवा हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे. या दोन्ही गोष्टी तिने साधत नाहीत. विद्वानालासुद्धा ‘ मला नोकरी द्या ’ म्हणून अर्ज करावा लागतो; म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी नाही. जीवनाला हवा, पाणी, अन्न या वस्तू आवश्यकच आहेत, त्या कशाही मिळवाव्यात. पण बाकीच्या वस्तू काही आवडीखातर, तर काही लौकिकात जरूर म्हणून पाहिजेत. पैसा असेल तर दैन्यवाणे राहू नये, पण त्यामध्ये आसक्ती असू नये. आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी, आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावे. ‘ मला कुणी शत्रू नाही आणि मित्र नाही ’ अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी. जो कशावरही अवलंबून नाही, ज्याच्या आड काही येत नाही, तो मुक्त समजावा. देहाला कुठेही लागले तरी आपल्याला जाणीव होते; त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचे स्मरण असणे हेच अनुसंधान होय; हीच विद्या होय, हाच खरा धर्म होय, आणि हेच परमार्थाचे सार होय.
जेव्हा आपण प्रत्येक कृती देवाला अर्पण म्हणून करतो तेव्हा ते यज्ञ बनतात आणि देवाच्या कृपेने त्या यज्ञाने आपणांस आनंद प्राप्ती होते.
म्हणून....आपल्या आनंदासाठी देवाने आपल्यावर केलेल्या सर्व कृपेबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ असले पाहिजे!!!
ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे, तो प्रपंचच त्याचा परमार्थ होतो.
|| श्री गुरू शरणं ||

No comments:
Post a Comment