Monday, December 1, 2025

उद्धरी गुरुराया ...दत्तजयंती पुष्प १०

 उद्धरी गुरुराया ...दत्तजयंती पुष्प  १०

 


 एक एक धाग्याने वस्त्र जरतारी विणावे।

एक एक पायरी ने शिखरी चढावे।।

एक एक श्वासासंगे नाम दत्ताचे घ्यावे।

एक एक नामासंगे दत्तरूपची व्हावे।।

 

कलियुगी अत्रिपुत्र दत्तात्रय हेच साधकांवर कृपा छत्र धारण करणारे दैवत आहे, आणि त्यांच्या नामाशिवाय दुसरा भक्तीमार्ग नाही. या जीवनाचा भार दत्त चरणी अर्पण करून ब्राम्हमूर्ती समर्थ पणे साधना करावी हीच सामर्थ्यवान बनवते एवढे सामर्थ्य नाम साधनेचे आहे. देहाची चारी अवस्था नामाच्या सह्याने व्यतीत करावी तरच मुक्तीच्या चारी अवस्था साधका समोर नतमस्तक होतील. सत्य संकल्प मनोरथ केवळ दत्त स्मरणाने पूर्ण होतील आणि जन्ममृत्यू च्या फेऱ्यातुन सहज बाहेर काढू शकतील.

*नामस्मरा गुरुदत्तांचे तुमचे कार्य साधेल, मज प्रचिती आली बहू तुम्हा देखील येईल..!

 

💐दत्त उपासना कशी करावी..?

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. अशात दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत कोणतीही कृती नेमक्या कशा पद्धतीने करावी, या विषयी माहिती जाणून घ्या.

·       दत्त पूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे दोन रेषांचे गंध लावावे.

·       दत्ताच्या मूर्ती किंवा फोटोला अनामिकेने गंध लावावे.

·       दत्ताला जाई आणि निशिगंधाची फुले ही सात किंवा सातच्या पटीत अर्पित करावीत. फुलांचे देठ देवाकडे करत वाहावीत. विष्णुरूपी दत्त जाहला म्हणून पिवळी फुले तुळस अर्पण का4यावी

·       दत्ताला चंदन, केवडा, चमेली, जाई आणि अंबर हीना सुंगधी असलेली उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा यात धरून घड्याळाच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने तीन वेळा ओवाळावी.

·       दत्ताला वाळा हे गंध  हिना अत्तर अर्पण करावे.

·       गुरुवार हा दत्तांचा वार असल्याचे मानले जातं. या दिवशी दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले जाते. उपवास ही करावा .

आपल्या भावानुसार देवतांनी सगुणात येऊन कार्य करणे अवलंबून असते. दत्त हा ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत असल्याने इतर देवतांच्या तुलनेत तो कमी कालावधीत सगुणात येऊन कार्य करतो; म्हणून इतर देवतांच्या तुलनेत दत्ताची उपासना सुलभ आहे.

 भजन , पूजन उपसनेत मुख्यतः श्रद्धा विश्वास हवा .दत्तमहाराज हे स्मतृगामी आहेत आर्त हाकेस त्वरित धावून येतात

 

लोक म्हणतात की ह्याच्याकडे काय आहे? हा काय करेल?...तु विसरलास का अमरापुरच्या गरिब विप्राला घेवड्याचा वेल उपटुन सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा दिला होता माझ्या सद्गुरुनी .....

ते दत्त महाराज भक्तांना काही कमी पडु देणार नाही .

त्रीदेव येती एका रुपा

दत्तनाम धारण करीत

चरणी मस्तक मी ठेवीतो

तुझ्या नामे देहभान विसरतो

 

रुप तुझे ध्यान तुझे

निर्गुण सगुण सोहळा

मन हे रंगो  दत्त नामा

दत्त राहो माझ्या मना

 

ऐकावे दत्त बोलावे दत्त

करावे दत्त स्मरावे दत्त

दत्ता ने हे जिवन व्यापले

दत्ता विना जिवनात दत्त

 

💐💐💐

 

No comments:

Post a Comment