Thursday, November 27, 2025

उद्धरी गुरूराया --- श्री दत्तजयंती पुष्प ६

 उद्धरी गुरूराया --- श्री दत्तजयंती पुष्प ६



दत्तमहाराज यांचे सार्थ वर्णन ---
निर्गुण निर्विकारा निजतेजा आनंदरूपा।
त्रिगुणात्मका त्रिमुखाषड्भुज यतिवरा।।
करितो सानंदे प्रणिपाता तव पादपद्मा।
स्वयंप्रकाशा भक्तावरी करी कृपावर्षावा।।
 
दत्त अवताराचे प्रयोजन   ...प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभांच्या मुखातूनच ...
श्रीपाद श्रीवल्लभ अवताराचे प्रयोजन, महायोग्यांना, महासिध्दांना, महापुरुषांना अनुग्रहित करून त्यांच्या करवी धर्माचा उध्दार करायचा. त्यांनी या अवतारानंतर नरसिंह सरस्वती नामरूपाने अवतार घेणार असल्याचे सांगितले, या दिव्य वचनावर जे कोणी अविश्वास दाखवतील त्यांना आणि श्रीपाद प्रभूच्या अवताराची जे अवहेलना करतील त्यांना पिशाच्च योनी प्राप्त होईल. ते बलहीन आणि अत्यंत हीन दीन अवस्थेस प्राप्त होऊन नरक यातना भोगतील. अशा पापी व्यक्तींना गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या अवतारात विमुक्ति मिळेल असे श्रीपादांनी सांगितले आहे .

प.पू श्री दत्त महाराजांना एका शिष्याने विचारले ,  " महाराज , संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात -- मनोवायुरुपा ओंकार स्वरुपा। विश्वाचिया रुपा पांडुरंगा । " यांचा अर्थ काय महाराज ? "   यावर महाराजांनी उत्तर दिले " ईश्वराचे स्वरुप केवढे आहे, किती मोठे आहे ,म्हणजे तो विश्वरुपी आहे .सर्व विश्व म्हणजे त्याच स्वरुप आहे .त्यात केवळ मानवच येतील असे नाही .मानव आहेत त्याच प्रमाणेसर्व पशु--पक्षीही त्याचीच स्वरुपे आहेत .ही वृत्ती अंतः करणात उत्पन्नझाली म्हणजे अहंकाराचा कासी संबंध नाही . निराभिमान होते त्याची वृत्ती.अभिमान कधी पहायला सुध्दामिळत नाही ,मग तो जीव परमेश्वरा- च्या कृपेने संसार सागरातून तरुन जातो .
आपल्या मनी हीच भावना येणे आवश्यक हे सर्व जगतच  दत्तस्वरूप आहे .               

आता आपण दत्तमंत्र स्वरूप फायदे व अर्थ समजून घेऊया ----

💐 दत्ताच्या मंत्राचे महत्त्व आणि जीवनावर होणारा प्रभाव --

दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जातात, ज्यामध्ये ब्रह्मा (सृष्टीकर्ता), विष्णू (संरक्षक), आणि महेश (संहारकर्ता) यांचे गुण एकत्रित आहेत. दत्तात्रेयाचे पूजन, मंत्रजप आणि ध्यान यामुळे मानसिक शांती, आध्यात्मिक उन्नती आणि जीवनात संतुलन साधण्यास मदत होते.

🌹 दत्ताच्या मंत्राचे महत्त्व 🌹

 *1. शांती आणि मानसिक स्थैर्य:* 
दत्तात्रेयाच्या मंत्रांचा नियमित जप मनाला शांत ठेवतो आणि तणाव, चिंता दूर करण्यास मदत करतो.

 *2. आध्यात्मिक प्रगती:* 
मंत्रजपामुळे आत्मशुद्धी आणि आत्मज्ञान प्राप्त होण्याचा मार्ग सुकर होतो.

 *3. संकटांवर मात करण्याची शक्ती:* 
दत्तात्रेय हे सर्व समस्यांचे समाधानकर्ते मानले जातात. त्यांच्या मंत्रांचा जप संकटांवर मात करण्याची शक्ती प्रदान करतो.

 *4. सकारात्मकता:* 
मंत्रजपामुळे मन आणि वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, ज्यामुळे जीवनात आनंद आणि समाधान येते.

 *5. कर्म शुद्धी:* 
दत्तात्रेयाचे मंत्र जपणे म्हणजे आपल्या कर्मांचे शुद्धीकरण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.

 आता दत्ताचे प्रसिद्ध मंत्र  जाणून घेऊया

 1. ॐ द्राम दत्तात्रेयाय नमः 

मनाला स्थैर्य आणि आत्मविश्वास देणारा मंत्र.

 2. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी जपला जाणारा मंत्र.

3. ॐ त्र्यम्बकाय त्रिवेदीयाय त्रिनेत्राय नमः 

त्रिमूर्तीच्या शक्तींचे आह्वान करणारा मंत्र. 


जीवनावर होणारा प्रभाव 

1. धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो.

2. आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्ग खुला होतो.

3. कुटुंबात सुख-समाधान नांदते.

4. जीवनातील दिशाहीनता कमी होते, आणि ध्येय साध्य करण्यास प्रेरणा मिळते.

5. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.

 दत्तात्रेयाच्या मंत्रांचा उपयोग कसा करावा?

सकाळी स्नान करून शांत चित्ताने जप करावा.

जपाच्या वेळी ध्यानधारणेची स्थिती ठेवावी.

मालांचा उपयोग करून मंत्राचे ठराविक वेळा जप करावा (जसे की 108 वेळा).

दर गुरुवारी दत्तात्रेयाचे ध्यान करणे अधिक फलदायी मानले जाते.

दत्तात्रेयाचे मंत्र जीवनाला नवीन ऊर्जा आणि स्थैर्य प्रदान करतात. नियमित जप, ध्यान आणि श्रद्धा यामुळे जीवनातील ताण-तणाव कमी होऊन आनंददायी आणि उन्नत जीवनाचा मार्ग सुकर होतो.

खरेतर  एक दत्तकृपेचे सत्य ...
   
दत्तगुरुकृपा होय ज्यास | 
दैन्य दिसे कैचे त्यास | 
समस्त देव त्यासी वश्य | 
कळिकाळाशी जिके नर ||

 एखादे समयी श्रीहरी | अथवा कोपे त्रिपुरारी | राखे श्री दत्तगुरु निर्धारी | आपुले भक्तजनासि ||

 दत्तगुरु पिता, दत्तगुरु माता | दत्तगुरु शंकरु निश्चिता | ईश्वरु होय जरी कोपता | दत्तगुरु रक्षिल परियेसा || 

दत्तगुरु कोपेल एखाद्याशी | ईश्वर न राखे परियेसी | ईश्वरु कोपेल जरी त्यासी | श्री दत्तगुरु राखेल निश्चित ||


आणखीन एक "गुरू श्री दत्तात्रेय बीज मंत्र" 
पाहू या बीज मंत्र

ॐ ऐं ह्रीं क्लीं ग्लौं दत्तात्रेयाय नमः।

मंत्रातील प्रत्येक बीजाक्षराचे अर्थ

१. ॐ (ओंकार) –
हे ब्रह्मांडाचे आदिस्वरूप आहे. सर्व ज्ञान, ऊर्जा व ब्रह्माचे प्रतीक. दत्तात्रेय हे स्वयं ब्रह्मरूप असल्यामुळे या मंत्राची सुरुवात "ॐ" ने होते.

२. ऐं (सरस्वती बीज) –
विद्या, बुद्धी व वाणीचा अधिपती. दत्तगुरूंचे एक रूप ‘ज्ञानस्वरूप’ आहे. ते त्रिकालदर्शी, त्रिवेणी ज्ञानाचे प्रतीक आहेत.

३. ह्रीं (महामाया बीज) –
आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असलेली शक्ती. हृदयस्थ शुद्धतेचे, भगवतीचे, आत्मिक शक्तीचे प्रतीक.

४. क्लीं (कामबीज) –
आकर्षण, भक्ती, समर्पण व सौंदर्याचा अधिपती. दत्तात्रेयांप्रती प्रेमभाव आणि भक्तिपूर्वक अर्पणाचे प्रतीक.

५. ग्लौं (गणपतिबीज) –
विघ्ननाशक शक्ती, शुभारंभाचे प्रतीक. दत्तगुरूंच्या अनुग्रहाने सर्व विघ्नांचे निवारण होते.

६. दत्तात्रेयाय नमः –
श्री दत्तात्रेयांना नमस्कार. इथे संपूर्ण श्रद्धा, समर्पण, शरणागत भाव व्यक्त केला जातो.

मंत्राचे फलश्रुती व फायदे (शास्त्रोक्त आधार)
  • ज्ञान, वैराग्य आणि समाधी प्राप्ती – श्री दत्तात्रेय हे त्रिगुणातीत असून योग, ज्ञान, वैराग्याचे मूर्तिमंत रूप आहेत. या मंत्राच्या नियमित जपाने साधकाला आत्मिक स्थैर्य व उच्च आध्यात्मिक पातळी प्राप्त होते.
  • सर्व रोग व संकटांपासून संरक्षण – दत्तगुरूंच्या बीज मंत्रात संरक्षणाची अद्भुत शक्ती आहे. अज्ञात भय, अपस्मार, उपद्रव, ग्रहबाधा यापासून मुक्ती मिळते.
  • गुरू कृपा व मार्गदर्शन प्राप्ती – श्री दत्तात्रेय हे आदिगुरू आहेत. या मंत्राच्या जपाने जीवनात योग्य गुरूंचे आगमन, सद्बुद्धी व योग्य मार्ग सापडतो.
  • घरातील दोष, वास्तुदोष निवारण – या मंत्राचे नियमित उच्चार केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.

जप पद्धती (शास्त्रसंमत)

मंत्र जप संख्येप्रमाणे:
▪︎ ११, २१, ५१ किंवा १०८ वेळा रोज जप करावा.
▪︎ उत्तम फलासाठी ब्रह्ममुहूर्तात जप सर्वोत्तम.

जपाची दिशा: 
पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे.

माळ वापर:
रुद्राक्ष, चंदन किंवा तुळशी माळेने जप करावा.

नियम:
आचरण शुद्ध ठेवून, सात्त्विकता बाळगूनच जप करावा.
सतत दत्तनामात राहा ।

  दंड कमंडलू धारी श्री दत्तराज योगी,
  दिव्य कांती श्री गुरुंची नयनांस दिपवी,
  चित्तवृत्ती सार्‍या होती क्षणी शांत,
    मुखी गर्जता श्री गुरुदेव दत्त !!
  🙏अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

1 comment:

  1. उत्तम माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद

    ReplyDelete