दीपावली पुष्प ४
दिवाळी / दीपावली
( आनंदोत्सव ,दीपोत्सव )
सर्वत्र साजरा होणारा महोत्सव 
“दिवाळी” किंवा “दीपावली” हा शब्द ‘दीप’ (दिवा) आणि ‘आवली’ (ओळ) या दोन शब्दांपासून तयार झाला आहे — म्हणजेच दिव्यांची ओळ.
ही उत्सवमाला अंधारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय, आणि अधर्मावर धर्माचा विजय याचं प्रतीक आहे.
हिंदू धर्मात ही पंचदिनीय उत्सव सर्वात मोठा आणि पवित्र मानला जातो .
दिवाळीचा धार्मिक आणि पौराणिक अर्थ
. भगवान श्रीरामांचा अयोध्येत पुनरागमन:
दिवाळी हा सण हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभु श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि सितामाता यांच्यासोबत १४ वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते.
अयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभु श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत तेव्हा पूर्ण अयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या सजवली होती.
जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला त्याच्याबरोबर २१ दिवसांनी श्रीराम हे अयोध्येत पोहोचले होते तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो म्हणजे लाखो वर्षांपासूनची ही परंपरा अजूनही हिंदू बांधव साजरी करतात. विशेष। म्हणजे दिवाळीला प्रभु श्रीराम यांच्या जागी महालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा का केली जाते.
दिवाळी हा सण ५ दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे. आता प्रथम आपण
या ६ दिवसाचं महत्त्व जाणून घेऊ
पहिला दिवस आहे धनत्रयोदशी. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरांसोबत समुद्रमंथन केलं होतं तेव्हा समुद्रातून १४ रत्न निघाले. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या पंचांगानुसार पितृपक्षाच्या १३ दिवसांनंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रातून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली. त्यादिवसांपासून या दिवसाला धनतेरस, धनत्रयोदशी असे नांव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो.
दिवस २ भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला:
या दिवशी श्रीकृष्णाने दैत्य नरकासुराचा वध करून पृथ्वीवरील लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. त्यामुळे या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते.
एके काळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता, त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो. पुढच्या जन्मात भूमिदेवीने सत्यभामाच्या रूपात अवतार घेतला, सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झाले. त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला.
तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरकचतुर्दशी या नावाने ओळखलं जातं.
दिवस ३ लक्ष्मी पूजन:
या दिवशी लक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झाली म्हणून लक्ष्मीपूजन विशेष केले जाते. ती संपत्ती, सौख्य आणि समृद्धीची देवी मानली जाते.
देव आणि दैत्य जेव्हा समुद्र मंथन करत होते तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली होती. तेव्हापासून त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश, सुख आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मी यांची पुजा होते.
दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश यांची सुध्दा पुजा होते.
पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माता पार्वतीचे २ पुत्र होते.
लक्ष्मीने पार्वतीजवळ श्री गणेश यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही. मग गणपतीची काळजी ती कशी घेईल. याच्यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जाईन तिथे गणपतीला सोबतच घेऊन जाईन.
म्हणून तेव्हापासून जिथे लक्ष्मीची तिथे गणपतीची सुध्दा पुजा होते.
खरंतर दिवाळीच्या दिवशी श्रीराम अयोध्येत आले होते परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पुजा होते.
पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णू हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत. त्यामुळे श्रीराम यांची पुजा केली जात नाही.
दिवस ४ भगवान विष्णूंचे वामनावतार आणि बलिराजाचा दिवस (बलीप्रतिपदा):
दिवाळीनंतरचा दिवस राजा बली याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. विष्णूने वामन रूप घेत बलीला पाताळात पाठवले, पण त्याला प्रत्येक वर्षी पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली — त्याचेच स्मरण बलीप्रतिपदा म्हणून करतात.
अश्विन अमावस्येला लक्ष्मीपुजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो.
साडे तीन मुहूर्तांपैकी एक हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
अक्षयतृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे. यादिवशी सोने खरेदी, सुवासिनी कडून पतिला ओवाळले जाते.
असे खूप काही महत्त्व आहेत
व्यापारी लोकांचे नविन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते.
हिशोबाच्या नविन वह्या ज्याला खतावणी म्हणतात त्यांचे पुजन करून नवीन सुरूवात केली जाते.
कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो.
दिवाळीचा पाचवा दिवस आहे गोवर्धन पुजा.
रामायणानुसार जेव्हा श्री राम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते तेव्हा सगळे वानर हे आप आपल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते तेव्हा हनुमानजीनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता.
परंतु ते यायच्या आतच सेतूचं काम झालं होतं. सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं. श्री राम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील.
आणि हनुमंताला सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेवून ये.
पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी कृष्ण अवतार घेतला तेव्हा गावातील लोकांना गोवर्धनाची पुजा करण्यास सांगितली.
याला नाराज होऊन इंद्राने गोवर्धन पर्वतावर आक्रमण केले. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला.
तेव्हापासून गोवर्धनाची पुजा केली जाते.
सहावा दिवस आहे भाऊबीज
यादिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले.
त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले. तेव्हा यमराजांनी हे वरदान दिले की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.
यादिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात.
पारंपरिक दिवाळी साजरी करण्याची पद्धत
घर स्वच्छ करणे आणि रंगोळी काढणे
दिवे लावणे आणि मंदिरे सजवणे
लक्ष्मी-गणपती पूजन करणे
फटाके फोडणे (पर्यावरणपूरक पद्धतीने)
मिठाई, फराळ, आणि नववर्षाच्या शुभेच्छा देणे
पुण्य संचय म्हणून वृद्ध, गरिबांना दान देणे
खरेतर दीपावलीचा धार्मिक संदेश असा आहे " आपल्या अंतःकरणातला अंधार दूर करून ज्ञान, सत्य आणि प्रेमाचे दिवे पेटवण्याचा उत्सव आहे.”
दिवाळी सण मोठा ..नाही आनंदा तोटा .
तर हे ६ दिवस दिवाळीचे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला या गोष्टी माहीत असायला हवी. अनेक शुभ कार्य दिवाळीच्या मुहूर्तवर सुरवात करतात. अबाल वृद्ध स्त्री पुरुष व सर्व समाज एकसंघ होऊन या सणात सहभागी होतात . आपणही सर्व भक्तांनी या आनंदोत्सवात सहभागी व्हा . एक विनंती आनंदातही काही वेळ काढून दत्त महाराजांची उपासना करा । शुभम भवतु ।
दिवाळी ...धार्मिक अधिष्ठान असलेला उत्सव ...भारतात सर्व धर्म व प्रांतात साजरा करतात..
जैन समाज : आश्विन अमावास्येला जैनांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजळतात आणि त्यांना 'निर्वाण लाडूं'चा भोग चढवतात. आणि नंतर फटाक्यांची आतशबाजी करतात.*
*आंध्रातील तेलुगू समाज.*
*ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंवा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात, मग दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात.*
*बंगाली समाज.*
*दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीबाड्यांत जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरांत दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन पंधरा दिवस आधी, म्हणजे शरद पैर्णिमेलाच झालेले असते.*
*बौद्ध समाज.*
*गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.*
*तमिळनाडूतीत मद्रासी लोक.*
*प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात.*
*महाराष्ट्रातील मराठी समाज.*
*लक्ष्मी पूजन सोडले, तर मराठी लोकांच्या दिवाळी कुठलाही धार्मिक विधी नाही. खाणे-पिणे सणांचा आनंद लुटणे, मित्र-मैत्रिणींच्या, आप्तांच्या भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्यांची आतशबाजी करणे अशी असते दिवाळी.
*कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा एकदा छोट्या प्रमाणात रोषणाई करून घरातले उरलेसुरले फटाके फोडून संपवतात. दिवाळीत बनवलेले व न संपलेले फराळाचे जिन्नस पुढच्या दिवसांत खाऊन संपवतात.*
*दिवाळी अंक.*
*महारा़्ष्ट्राचे वाङ्मयीन भूषण म्हणजे मराठी दिवाळी अंक. दरवर्षी सुमारे ८०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. मराठी माणसे किमान एक दिवाळी अंक विकत घेतात आणि इतर अनेक अंक लोकांकडून किंवा वाचनालयातून आणतात व वाचतात.*
*दिवाळीच्या दिवसांत मुले किल्ले करतात. आकाशदिवा बनवतात. किल्ल्यांची तिकीट लावून प्रदर्शने भरतात. रांगोळीची प्रदर्शनेही असतात. शहरातील अजून शिल्लक असलेल्या हौदांच्या पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. लोक हौसेने या रांगोळया पाहण्यासाठी रांगा लावून तिकिटे काढतात.
*केरळमधील मल्याळी समाज.* *दिवाळीच्या दिवशी अय्यप्पा देवाची पूजा करतात. घरांभोवती आणि मंदिरांत रांगोळी काढून दिवे लावतात. दक्षिण भारतीय मिष्टान्ने बनवून लोकांना केळीच्या पानांमधून प्रसाद वाटतात.*
*पंजाबातील शीख समाज : शीखांच्या ६ व्या गुरूंना जहांगीर बादशहाने कैद करून ठेवले, त्यांची आश्विन अमावास्येला सुटका झाली. म्हणून शीख तो दिवस 'दाता बंदी छोड दिवस' म्हणून साजरा करतात.*
*सिंधी समाज : पूर्वी सिंधू नदीच्या काठी दिवे लावायची सिंधी परंपरा होती. आता घरात गणेशाची आणि लक्षमीची पूजा करून घराच्या दरवाज्यांत दिवे लावतात.
आपले सर्व आप्त स्वकीय व कुटुंबीय यांना दिवाळी व नूतन वर्ष सुख समृद्धी , समाधान आयु व आरोग्य प्राप्त व्हावे हीच दत्तमहाराज यांचे चरणी प्रार्थना . कल्याण मस्तु ।।