।। श्री गुरू शरणं ।।
स्मरा स्मरा हो दत्तगुरु ...
दत्तगुरु भव ताप हरू
श्री गुरुदेव दत्त हा परमेश्वराचा ‘अनंत कालाचा अनंत भावाचा । अनंत जीवाचा कनवाळू’ अवतार आहे. ‘नाश कल्पान्तीही असेना’ असा हा अवतार आहे. ‘नाना अवतार होऊनिया गेले । दत्तत्व संचले जैसे तैसे ।’ अशी या अवताराची थोरवी प्रज्ञाचक्षू गुलाबमहाराज वर्णन करतात. हा अवतार ‘भोगमोक्षसुखप्रद:’ आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ हा श्रीदत्तप्रभूंचा दुसरा अवतार. ‘कलौ श्रीपाद श्रीवल्लभ:’ अशी या अवताराची ख्याती आहे. श्रीनृसिंह सरस्वती हे श्रीदत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्धी पावले.
श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराणप्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्रीनृसिंह सरस्वतींनी केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले.
श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे. श्रीगुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत. श्री नृसिंह सरस्वती. श्री गुरूचरित्रात अध्याय ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. श्री नृसिंह सरस्वती संन्यासधर्माचे सर्वोत्तम आदर्श होते.
दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्ती मिळते.
दत्त जयंती व गुरू पौर्णिमा या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नामजप केल्यास दत्त-तत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते.
दत्तमहाराज यांचे स्वरूप कसे तर...
दत्त वसे औदुंबरी । त्रिशूल डमरू जटाधारी ॥
कामधेनू आणि श्वान । उभे शोभती समान ॥
गोदातीरी नित्य वस्ती । अंगी चर्चिली विभूती ॥
काखेमाजी शोभे झोळी । अर्धचंद्र वसे भाळी ॥
एका जनार्दनी दत्त । रात्रंदिन आठवीत
हा भक्तराज असा दिसतो ...
काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलू पद्मकरेण शंख चक्र गदाभुषित भुषणाढ्यं श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये
दत्त महाराजांचे सगुण आणि साकार दर्शन दिले तरच त्याला अनुभूती म्हणायचे का ? कि स्वप्नात येऊन काही सांगितले त्याला अनुभूती म्हणायचे ? अनुभूती म्हणजे एक असा अनुभव जो केवळ चित्ताला प्रमाण होतो ,ग्राह्य होतो.दर्शन दिले तर ती निश्चितच मोठी अनुभूती आहे. पण केवळ दर्शन म्हणजेच अनुभूती नाही . दत्त महाराजांचे नाम घेण्याची बुद्धी होणे ,ते घ्यावे हे चित्ताला वाटणे ही देखील अनुभूतीच आहे . त्यांचे कोणत्याही प्रकारे स्मरण होणे ,त्यांच्या एखाद्या क्षेत्राला जावे असे वाटणे ,त्यांच्या नाना लीलांचे अवलोकन होणे ,एखाद्या ग्रंथाचे पारायण ,वाचन होणे तात्पर्य दत्त महाराजांशी निगडित काहीही होणे ही अनुभूतीच आहे . मला दत्त महाराज प्रिय आहेत ही गोष्ट आणि दत्त महाराजांना मी प्रिय आहे ही गोष्ट यात जमीन अस्मानाचा फरक आहे . अनुभूती म्हणजेच दत्त महाराजांना आपण प्रिय होणे आणखी काही नाही .
झाडाचे पान देखील दत्त गुरूंच्या इच्छेशिवाय हालत नाही. तेव्हा त्यांचे स्मरण होणे म्हणजेच चित्ताला दत्त महाराजांनी दिलेली चालना आहे हे निश्चित , तेव्हा नित्य त्यांच्या कथांचे , लीलांचे स्मरण होणे , वाचन होणे .चिंतन मनन होणे हि सर्व लक्षणे म्हणजे दत्त महाराजांना आपली कायम आठवण असल्याचीच द्योतक आहेत .
मात्र अनेकदा ह्या उपासनेत विघ्ने कायम अडसर बनू पाहतात . कथा कादंबरी वाचताना होणारी उल्हसित चित्तवृत्ती गुरुचरित्र वाचनावेळी आळसावते , जांभया येऊ लागतात , डोळे मिटू लागतात . वाचनाची उरलेली पाने किती याचा बुद्धी वेध घेते . जोर जबरदस्तीने केलेली उपासना फलद्रुप का होत नाही, तर चित्त वाचनात नसताना आपण केवळ शब्दांचा वेध घेत असतो . अगदी थोडक्या पासून सुरुवात करावी . लिलांच्या कथा वाचा , नामस्मरण होऊ द्या , एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन या ,हळूहळू हे सर्व वाढत जाईल म्हणून थोरले महाराज म्हणत श्री गुरुचरित्राच्या पाच ओव्या तरी रोजच्या चुकवू नका. ते नित्य पारायण करा का म्हणाले नाहीत. तर किती होते यापेक्षा नेमाने काहीतरी होते याला महत्व आहे . यासाठी पुन्हा दत्त महाराजांचीच प्रार्थना करून म्हणायचे कि , केवळ तुमची आठवण व्हावी यावर मला मर्यादित न ठेवता नित्य नवविधेची पात्रता येऊ द्या , कायम सान्निध्य द्या
दत्तमहाराज स्मतृगामी आहेत म्हणून संकटात खालील मंत्राचा जप करावा ...
"अनसूयोत्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगम्बरः।।
*स्मर्तृगामी स्वभक्तानामुद्धर्ता भव संकटात्।। "
अनेक जन्मातील पापं चे क्षय होऊन*
*पुण्यकर्म फल प्रारंभ झाल्या शिवाय*
*दत्त भक्ति उदित होत नाही.*
*कुठल्या ही काळात भक्ताला*
*दत्त भक्तित पूर्ण रूप सिद्धि प्राप्त*
*होताच, त्याला साक्षत श्रीपाद*
*वल्लभांचे दर्शन ,स्पर्श,* *त्यांच्याशी*
*संभाषण आशा गोष्टीचा दुर्लभ*
*योगाचा भाग्योदय होतो.... !!!
लोक म्हणतात की दत्तमहाराज यांचेकडे काय आहे? हे काय करतील ?...लक्षात घ्या अमरापुरच्या गरिब विप्राला घेवड्याचा वेल उपटुन सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा दिला होता माझ्या सद्गुरुनी .....
ते दत्त महाराज कोणालाही काही कमी पडु देणार नाहीत .
ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो, तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. गुरुदत्त हे नाव मुखात येऊन त्या ठिकाणी चित्त गुंगून जाते. आपले जे जे काही आहे.. तसे पहायला गेले तर ते आपले नाही. पण त्याचे स्थान त्या चित्तामधे आपोआपच येऊ लागते. हि स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन, आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सदगुरुंच्या कृपाछत्रात या दत्तनामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर हवा. त्यात ते स्मरण चित्तात जखडुन टाकले पाहिजे आणि अनुभुती पर्यंत आलेली कष्टमय सेवा हि या दृढतेची कास धरुन, हळूहळू एके ठिकाणी नेम धरुन, मुळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःच्या स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. हि तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता, अनुभूती मधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढवावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करुन, मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करुन दिली जाते तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. यासाठी दृढतेची कास धरुन त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा दत्त या नामाने भक्ताला त्याच्यापर्यंत नेऊन पोहचवेल
.श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते कुरवपुरांतच आहेत. आपल्या भक्तीभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरु या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरुसारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास, तेच परमात्मा आहेत असे सिध्द करतात."
क्षणो क्षणी तो देतो मजला,
*श्वासामागुनी श्वास नवे..
*कशास मागू श्री दत्ताला,
*मज हेच हवे, अन् तेच हवे?
आता फक्त एकच इच्छा ...
मुखदर्शन व्हावे आता ,
*तू सकल जगाचा त्राता ,
*घे कुशीत गा गुरूमाऊली ,
*तुझ्यापाउली ठेवीतो माथा ॥
श्री दत्तमहाराज यांचे चरणी समर्पित...
।।शुभम भवतु ।।

No comments:
Post a Comment