Thursday, May 1, 2025

आर्थिक संकटातून मुक्तता

 



आर्थिक संकटातून मुक्तता ..(प्रासादिक उपाय )


लक्ष्मीप्राप्तीसाठी प. प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी सर्वांसाठी सांगितलेली प्रासादिक, प्रभावी आणि अनुभवसिद्ध मंत्रोपासना

प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रासादिक आणि प्रभावशाली मंत्र सर्वांसाठी दिलेला आहे. आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी नेमके काय करायला हवे याचे उत्तर स्वतः स्वामी महाराजांनी या मंत्राच्या माध्यमातून दिले आहे. हा मंत्र खालील प्रमाणे आहे. 

*ॐ श्रीं श्रियै नमः श्रीमत्सौभाग्यजननीं स्तौमि लक्ष्मीं सनातनीं I  सर्वकामफलावाप्तिसाधनैकसुखावहाम् II*

हा मंत्र स्नानानंतर कमीत कमी दहा वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा म्हणावा. या मंत्राचे पठण स्त्री पुरुष करू शकतात.

।। भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज श्रीसदगुरुराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ।।

🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻

No comments:

Post a Comment